Online fraud
Online fraud sakal
पुणे

एमएसीईबीच्या निवृत्त अधिकाऱ्याला जीवनसाथीवर १६ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागातून (एमएसीईबी) अभियंता म्हणून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या आमिषाने ऑनलाईन चोरट्यांनी १६ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

पुणे - महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागातून (एमएसीईबी) (MACEB) अभियंता (Engineer) म्हणून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला लग्नासाठी (Marriage) स्थळ दाखविण्याच्या आमिषाने ऑनलाईन (Online) चोरट्यांनी १६ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा (Fraud) घातला आहे. या प्रकरणी ६२ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याने लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार (Complaint) दाखल केली आहे.

विनोद पटेल, नर्गीस खातुन, सुदिप्ता भट्टाचार्य, झंटु सोरेन यांच्यासह इतरांवर या प्रकरणी फसवणूक व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आहे आहे. २३ नोव्हेंबर २०२० पासून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादी यांचे पत्नी व मुलांशी कौटुंबिक वाद झाले आहे. त्यामुळे ते विभक्त राहत आहेत. उतारवयात जीवनसाथी असावा, या उद्देशाने त्यांनी विवाह विषयक संकेतस्थळ असणाऱ्या जीवनसाथी या वेबसाइटला भेट देऊन रजिस्ट्रेशन केले. या नोंदणीचा गैरफायदा आरोपींनी त्यांच्याकडून १६ लाख ३२ हजार रुपयांचे उकळले आहे.

याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कौटुंबिक वादामुळे पत्नी व मुलांपासून वेगळे राहत आहेत. वय झाल्याने आधारासाठी कोणी साथीदार असावा या उद्देशाने त्यांनी जीवनसाथी या संकेतस्थळावर लग्नासाठी नाव नोंदणी केली. त्यावेळी लव्ह.इन या वेबसाइटवरून त्यांना लग्नासाठी ९२० रुपये भरण्यासाठी फोन आला. त्याप्रमाणे त्यांनी पैसे भरले असता त्यांना वेगवेगळ्या नंबरवरुन त्यांना फोन येवू लागले.

लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या आमिषाने, हॉटेलचे भाडे, सुरक्षेसाठी अनामत रक्कम यासह इतर खर्चासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख ३२ हजार रुपये आॅनलाईन घेऊन त्यांचे पैसे परत न करता फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT