पुणे

भात काढणीची प्रक्रिया यंदा लांबली

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर (पुणे) : यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम भात काढणीवर झाला आहे. अजूनही भात खाचरे ओली आहेत. त्यामुळे भात काढणी, मळणी आणि भरडणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भात काढणीची प्रक्रिया लांबली आहे.

भोर तालुक्‍यात इंद्रायणी तांदळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पावसाचा परिणाम यंदा भात काढणीच्या प्रक्रियेवरही झाला आहे. भात काढणीचा हंगाम सुरू होईपर्यंत भात खाचरे पूर्णपणे सुकलेली असतात. परंत,ु यावर्षी भात खाचरांमध्ये पाणी असल्याने ओलावा आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना चिखलामध्ये भात काढणी करावी लागत आहेत. खाचरांमध्ये पाणी असल्याने यंत्राच्या साहाय्यानेही भात काढता येत नाही. त्यामुळे मजुरांना घेऊन भात काढणी करावी लागत आहे. खाचरात पाणी असल्याने वाळवणी आणि मळणी योग्यरीत्या होत नाही. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळेही भाताची कामे थांबली आहे.

उत्पादन निश्‍चित घटणार
पावसामुळे अगोदरच मोठ्या प्रमाणावर भात पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा भात उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत निश्‍चित कमी होणार आहे. मात्र, भात वाळवणी आणि मळणी व्यवस्थित होत नसल्याने त्याचाही परिणाम तांदळाच्या उत्पादनावर झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

गेल्या वर्षी खाचरे कोरडी होती. त्यामुळे भात काढणी ते मळणी फक्त सहा दिवसांत झाली होती. मात्र, यंदा ओल्या खाचरांमुळे या सर्व भात काढणी ते मळणीच्या प्रक्रियेला एकूण चौदा दिवस लागले. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादनातही घट झाली आहे.
- अप्पा धनावडे, शेतकरी

भात भरडणीसाठी भात वाळवणी आणि मळणी चांगली झाली तरच तांदूळ चांगल्याप्रकारे निघतो. मात्र, सध्या भात खाचरे ओली असल्याने भात वाळवणी आणि मळणीला उशीर होत आहे. त्यामुळे सध्या भात गिरण्यांमध्ये भरडणीसाठी येणाऱ्या साळींचे प्रमाण कमी आहे.
- प्रकाश निगडे, भात गिरणी चालक

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT