आळंदी, ता. २३ : सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होईल, अशा तऱ्हेने रिक्षा उभी केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. विष्णू शिवाजी चव्हाण (वय ३४, रा. केळगाव) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ही कारवाई वडगाव चौक येथे पोलिसांकडून रविवारी (ता. २३) सकाळी साडेअकराच्या दरम्यान करण्यात आली. याबाबत फिर्याद पोलिस शिपाई सुप्रिया गोरख शिंदे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे. विष्णू चव्हाण यांनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच १४, एमएस ५०९६) ही आळंदी शहरातील प्रदक्षिणा रस्त्यावरील वडगाव चौकात उभी केली होती. विना परवाना आणि वाहतुकीस अडथळा होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभी केल्याने पोलिसांनी कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.