Sharad Pawar 
पुणे

वैद्यकीय क्षेत्राचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून पुण्याचा उदय : शरद पवार

सम्राट कदम

पुणे : पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या पुण्याने स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी केली. क्रांतीकारक चळवळींबरोबरच स्वदेशी शिक्षणाची मुहूर्तमेढ येथेच रोवली गेली. विद्येचे माहेरघर असलेले हेच पुणे यशवंतरावांच्या काळात औद्योगीक केंद्र म्हणून विकासाला आले. आता ते वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून एक नवी ओळख निर्माण करत आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

सेनापती बापट रस्त्यावरील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. नरेंद्र वैद्य आणि डॉ. मिताली वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. केतन वर्तक, डॉ. स्नेहल देसाई, डॉ. नागेश राव, डॉ. पराग मोडक, डॉ. उमाकांत गलांडे, समुपदेशक शेखर माने आदींचा कोविड काळातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला होता. लोकमान्य हॉस्पिटलच्या कोविड काळातील कामाचा आणि शस्त्रक्रियेसाठी उभारलेल्या अत्याधुनिक सुविधांचा आढावा डॉ. नरेंद्र वैद्य यांनी घेतला. अपघात किंवा आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आधुनिक सुविधा, शस्त्रक्रिया केंद्र, हाडांशी निगडित उपचार आदींची व्यवस्था रूग्णालयात करण्यात आली आहे.

म्हणून हिंजेवाडीत आयटी उद्योग...

साखर कारखान्याच्या भुमिपुजनासाठी मी हिंजेवाडीत गेलो होतो. तेथील परिसर आणि देशाची गरज पाहता तेथे माहिती तंत्रज्ञान उद्योग अर्थात आयटी पार्क उभारावा ही माझी इच्छा होती. मी भूमिपूजन करतानाच सांगून टाकले,‘‘आजचे भूमीपूजन जरी साखर कारखान्याचे असले तरी येथे तो होणार नाही. तीस-चाळीस किलोमीटर दूरवर आपण तो उभारू. इथे मात्र आयटी कंपन्या उभ्या राहतील. आणि बघता बघता पुण्याची ओळख आयटी हब म्हणून झाली.’ , अशी आठवण पवार यांनी यावेळी सांगितली.

‘‘कोरोनासारख्या अनेक आपत्ती राज्यावर आल्या आहेत. मग तो लातूरचा भूकंप असो की मुंबईवरील दहशतवादी हल्ला. यांच्या उद्रेकाचे स्वरूप मात्र क्षणिक होते. कोरोना विरुद्ध आपल्याला दीर्घकाळ लढायला लागेल. लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने दिलासा द्यायला हवा.’’

- शरद पवार, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर..

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT