River-Development
River-Development 
पुणे

‘नदीकाठ विकसन’ला अद्याप मिळेना मुहूर्त

सकाळवृत्तसेवा

पुणे - नदीसुधार योजनेपाठोपाठ मुळा-मुठा नदीकाठ विकसन व संर्वधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) नेमून दहा महिने झाले; तरीही ही योजना पुढे सरकू शकलेली नाही. केंद्रीय पर्यावरण खात्याच्या आक्षेपामुळे योजनेच्या अंमलबजावणीचा मुहूर्त हुकला आहे. योजनेसाठी केंद्राऐवजी राज्य सरकारची परवानगी घेतली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.  

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या काठाचे विकसन आणि संवर्धन करण्याची ही योजना आहे. त्यासाठी सुमारे २ हजार ६१९ कोटी रुपये खर्च येणार आहे. तिचे काम तीन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) नेमण्याला मार्चमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. योजनेचा सविस्तर आराखडाही तयार झाला आहे.  

नदीसुधार योजनेच्या धर्तीवर दोन ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येतील. ज्यामुळे नद्यांलगतच्या गावांमधून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. या योजनेला परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे वर्षापूर्वी पाठविला होता. तेव्हा केंद्राने यावर आक्षेप घेतले होते. महापालिकेचे अतिरिक्त नगरअभियंता श्रीनिवास बोनाला म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने आक्षेप घेतल्यानंतर नव्याने प्रस्ताव पाठविला होता. मात्र, काही नियम बदलल्याने आता राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याची परवानी घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. येत्या पंधरा दिवसांत ती मिळेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT