पुणे

अष्टविनायक महामार्गावरील निकृष्ट कामांविरोधात रास्ता रोको

CD

कवठे येमाई, ता. १ : अष्टविनायक महामार्गावरील अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात मलठण व सोनेसांगवी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी शनिवारी (ता. २८) रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रखडलेल्या कामांमुळे आणि साईडपट्ट्यांचे मजबुतीकरण न झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच मलठण गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात अनिल काशिनाथ दाते व रोहित राजू भोसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.
रांजणगाव गणपतीकडे जाणाऱ्या या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वीही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत-झाडे, खचलेल्या साईडपट्टया, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, गटार लाईनची दुरवस्था व दिशादर्शक फलकांची झालेली मोडतोड आणि अर्धवट कामे यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच, परिसरातील खाणकामांमुळे अवजड वाहने वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना वारंवार सूचना देऊनही रखडलेली कामे पूर्ण करण्यात आलेली नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
अष्टविनायक महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी येत्या आठ दिवसांत अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावेत आणि साईडपट्टयांचे मजबुतीकरण करावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार व मंडल अधिकारी विजय फलके यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, माजी सरपंच विलास थोरात, दत्तात्रेय कदम, पोपट साळवे, मल्हारी काळे, मुकुंद नरवडे, संदीप गायकवाड, किरण देशमुख, मंगेश दंडवते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT