pune municipal commissioner rajendra bhosale sakal
पुणे

Dr. Rajendra Bhosale : सोसायट्यांमध्ये काँक्रिटीकरण केल्याने रस्ते जलमय; सोसायट्यांवरच फोडले खापर

पुण्यात गेल्या आठवड्यात दोन वेळा पावसाने झोडपून काढले. अवघ्या अर्ध्या तासामध्ये शहरातील पावसाळी गटारांची क्षमता संपली, त्यामुळे रस्त्यावरून नद्या वाहू लागल्या.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील सोसायट्यांमध्ये सिमेंट काँक्रिट करण्यात आले आहे, त्यामुळे पाणी थेट रस्त्यावर आल्याने रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळे पाणी जिरविण्यासाठी सोसायट्यांमध्ये पाणी जिरविण्यासाठी चर खोदावे लागतील असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील पूरस्थितीचे प्रशासनाने सोसायट्यांवरच खापर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यात गेल्या आठवड्यात दोन वेळा पावसाने झोडपून काढले. अवघ्या अर्ध्या तासामध्ये शहरातील पावसाळी गटारांची क्षमता संपली, त्यामुळे रस्त्यावरून नद्या वाहू लागल्या. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत तर काही ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी तुंबले. अनेक घरात, दुकानात पाणी शिरले, दुचाकी पाण्यात वाहून गेल्या, चारचाकी पाण्यात बुडाल्या.

शहरात दाणादाण उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बांधकामासाठी वळविले गेलेले नाले, नाले बुजवून करण्यात आलेले अतिक्रमण, पावसाळी गटारांची स्वच्छता न करणे, त्यामधून फायबर ऑप्टिकल केबल टाकणे यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे आत्तापर्यंत समोर आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी आज (ता. १०) पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याबद्दल ते म्हणाले, शहरात नाले बुजवून, वळवून बांधकामे करण्यात आली आहेत, अतिक्रमण केली आहेत. त्यामध्ये सुधारणा केली जाईल. शहरात पाणी तुंबल्यानंतर महापालिकेची यंत्रणा त्वरित कार्यान्वित झाली होती.

ज्या ठिकाणी जास्त पाणी तुंबले होते तेथे लगेच उपाय योजना सुर केल्या आहेत. सोसायट्यांमध्ये सिमेंट कॉँक्रिटीकरण केले आहे,त्यामुळे तेथील पाणी थेट रस्त्यावर येत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी चर खोदून पाणी जिरविण्याची व्यवस्था करावी लागेल.

उपायुक्तांना नाइट ड्यूटी

शहरात मुसळधार पाऊस पडत असताना संपूर्ण शहरावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून कनिष्ठ अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याकडून लक्ष ठेवले जात होते. पण त्यातून समन्वय ठेवला जात नव्हता. त्यामध्ये आता आयुक्तांनी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. त्यांनी शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असणारी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाशी समन्वय ठेवून काम करावे. ज्या भागात जास्त पाऊस झाला तेथे लगचे मदत पोचविणे, त्यासंदर्भात आदेश देणे अशी कामे या उपायुक्तांना करावी लागणार आहेत.

रोज रात्री एका उपायुक्त स्तरावरचा अधिकारी या ठिकाणी नियुक्त असणार आहे, असे आयुक्त डॉ. भोसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT