firing-kothrud
firing-kothrud 
पुणे

कोथरूडमध्ये भरदिवसा दागिन्यांची लूट (Video)

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोथरूड परिसरातील पेठे ज्वेलर्स या सराफी दुकानामध्ये चोरट्यांनी भरदिवसा गोळीबार करीत दहशत निर्माण केली. पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील लाखो रुपये किमतीचे ५०० ते ६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. सुदैवाने गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही. 

याप्रकरणी कर्मचारी मंगेश वेद यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर येथे मुख्य चौकामध्ये पराग पेठे यांच्या मालकीची पेठे ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. दुकानात दुपारी सव्वाचार वाजता दोघे जण ग्राहक असल्याचा बहाणा करीत दुकानामध्ये आले. त्या वेळी पेठे दुकानामध्ये नव्हते. दुकानात प्रवेश करताच त्यातील एकाने कमरेला लावलेले पिस्तूल काढून दुकानातील चार कर्मचाऱ्यांवर रोखून धमकावले. त्याचवेळी दोन गोळ्या हवेत झाडून कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला नाही. त्यानंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी चोरट्यांनी सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या दागिन्यांचे ट्रे काढून दिले. काही मिनिटांतच सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली सॅक घेऊन चोरटे दुकानाबाहेर पडले. तेथून दुचाकीवरून चांदणी चौकाच्या दिशेने पळून गेले. 

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी याबाबत पेठे यांना चोरी झाल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, शिरीष सरदेशपांडे, डॉ. शिवाजी पवार, कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांनी लुटलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने सोन्याचे पाणी दिलेले (गोल्ड प्लेटेड) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

चोरीचे दृश्‍य सीसीटीव्हीत कैद
चोरट्यांनी दुकानामध्ये घुसून चोरी करतानाचे दृश्‍य दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. तसेच, कोथरूड पोलिस व गुन्हे शाखेची पथके तत्काळ आरोपींच्या मागावर पाठविण्यात आली आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT