रहिमतपूर येथे रास्ता रोको आंदोलन
सातारा-रहिमतपूर राज्यमार्गावरील निकृष्ट कामांचा निषेध; ठेकेदार व प्रशासनाविरोधात संताप
रहिमतपूर, ता. २६ : येथील शहर व परिसरातील विविध रस्त्यांची कामे रखडल्याने, तसेच झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या निषेधार्थ आज सातारा-रहिमतपूर राज्यमार्गावरील एसटी स्टँड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने व शिवसेनेचे वासुदेव माने, माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष केतन माने, नगरसेवक विद्याधर बाजारे, राजेश कदम आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
रहिमतपूर- वडूज रस्ता, रहिमतपूर ते अंभेरी घाट, खंडाळा-कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव मार्केट-कऱ्हाड मार्गावरील रहिमतपूर ते मोहितेवाडी जंक्शन, तसेच सुर्ली ते रहिमतपूर आणि रहिमतपूर चौक सुधारणा या कामांना प्रशासकीय मान्यता मिळूनही कामे बंद पडली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही ठिकाणी सुरू झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचेही नागरिकांनी नमूद केले.
दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गांवरील दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत असून, गेल्या दोन वर्षांत खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान संबंधित ठेकेदार व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. रखडलेली कामे तत्काळ दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. वेळी रहिमतपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
01635
रहिमतपूर ः सातारा-रहिमतपूर राज्यमार्गावर रास्ता रोकोत सहभागी राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी. (इम्रान शेख ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.