Rohit Pawar sakal
पुणे

Rohit Pawar : पवारांची युवा संघर्ष पदयात्रा पुणे ते नागपूर प्रवास

राज्यातील युवा पिढीला साद घालण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर युवा संघर्ष पदयात्रेचे आयोजन केले आहे.

सम्राट कदम

पुणे - राज्यातील युवा पिढीला साद घालण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर युवा संघर्ष पदयात्रेचे आयोजन केले आहे. पुण्यातील तुळापूर येथून २५ ऑक्टोबर रोजी सुरू झालेली यात्रेचे ५ डिसेंबर रोजी नागपुरात समापन होणार आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी यासंबंधीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘एकूण ८०० हून अधिक किलोमीटर प्रवास पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्यातील बेरोजगारीचा वाढलेला दर, परीक्षा आयोजित करण्यात होणारा दीर्घकाळ विलंब, कायमस्वरूपी पदांऐवजी कंत्राटी नोकऱ्यांचा प्रसार आणि तरुणांच्या समस्यांबाबत युवा वर्गाशी भेटून चर्चा केली जाणार आहे.

त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आणि इच्छा आहेत त्याबाबत व्यक्त होण्याची संधी त्यांना या यात्रेदरम्यान मिळणार आहे.’ तरुणांना भेडसावणाऱ्या आव्हानांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थेट जनतेशी संवाद आवश्यक असून, ही चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले. तरुणांच्या विविध समस्यांकडे कायमच सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

याबाबत विधानसभेत महाराष्ट्रातील तरुणांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. परंतु सरकार उदासीन असल्याचे पाहायला मिळत असल्याचा आरोप पवार यांनी केला. ते म्हणाले, ‘सरकारच्या उदासीनते त्यामुळेच पदयात्रेच्या माध्यमातून आता रस्त्यावर उतरत आहोत.

तरुणांना भेडसावणाऱ्या आव्हानांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन ही चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.’

मोहिमेचा पहिला टप्पा ४२ दिवसांचा असून, त्यात १० जिल्हे, २८ तालुके आणि ४६० हून अधिक गावातून ही पदयात्रा जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT