Rohit Pawars revelation about Fadnavis claim to establish Alliance with NCP
Rohit Pawars revelation about Fadnavis claim to establish Alliance with NCP 
पुणे

मोठी बातमी : राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेच्या फडणवीसांच्या दाव्याबाबत रोहित पवारांचा खुलासा

वृत्तसंस्था

पुणे : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेसाठी दोन वर्षापूर्वीच बोलणी झाली असल्याच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी खुलासा केला आहे. रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यामागे काहीतरी राजकारणच असावं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रावादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेची ऑफर दिली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर रोहित पवार यांनी फडणवीसांचा हा दावा फेटाळून लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यामध्ये कुठलेही तथ्य नसून राष्ट्रवादी आणि पवार साहेबांची विचारसणी ही वेगळी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. आता महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेले असून सध्या राज्यासमोर असलेल्या अडचणी या खूप वेगळ्या आहेत. लोकांसमोर अडचणी असून आमचे सर्व नेते हे लोकांच्या अडचणी सोडविण्यावर लक्ष देत आहेत. परंतु, असे असताना विरोधी पक्षातील मंडळी मात्र राजकारण करण्यात गुंतली असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
---------
डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार
---------
पाकिस्तानवर मोठी नामुष्की; 'या' यादीतील नाव कायम
---------
दरम्यान, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट ग्रीन सिग्नल होता. दोन बैठकाही झाल्या होत्या. त्यातील एका बैठकीला मी हजरही होतो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने असता तर मी आणि अजित पवारांचे सरकार १०० टक्के टिकले असते. दोन वर्षापूर्वीही राष्ट्रवादी आणि आम्ही सोबत यायचे ठरले होते. मात्र, शिवसेनेला सोडायचे नव्हते. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले तरी शिवसेनेला सोडायचे नाही असे पंतप्रधानांनी सांगितले होते, त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत नसल्याचा दावा एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावेळी ही ऑफरही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच दिली असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT