Mahadev Jankar
Mahadev Jankar 
पुणे

बारामतीसह 'या' पाच मतदारसंघाची युतीकडे रासपची मागणी

सकाळ वृत्तसेवा

बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, भोर व शिरुर या पाच मतदारसंघाची मागणी भाजप-सेना युतीकडे केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रासपची आज (गुरुवार) महत्त्वाची बैठक पुण्यात झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेळी-मेंढी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा अध्यक्ष संदीप चोपडे, राज्याचे उपाध्यक्ष अजित पाटील, दादासाहेब केसकर, माणिकराव दांगडे पाटील, अण्णासाहेब रुपनवर, मणेर काझी, नितीन धायगुडे, श्रध्दा भामंब्रेकर, लक्ष्मण हाके आदी उपस्थित होते. 

दरम्यान, कॉग्रेस व राष्ट्रवादीतील बरीच नेतेमंडळी रासपच्या संपर्कात असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. दौंडसह बारामती, इंदापूर, भोर व शिरुर या मतदारसंघात पक्षाचे कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आम्ही दावा सांगत आहोत, असे संदीप चोपडे यांनी सांगितले. दौंडमध्ये तर पक्षाचा विद्यमान आमदार आहे व इतर मतदारसंघातही रासपची ताकद तुलनेने अधिक असल्याने भाजप-सेना युतीकडे या मतदारसंघाची मागणी करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्फत करण्याचे आजच्या बैठकीत निश्चित झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT