rsp will fight independently for lok sabha in baramati mahadev jankar from madha  Sakal
पुणे

Lok Sabha Election : बारामतीत लोकसभेसाठी रासप स्वतंत्रपणे लढणार तर माढ्यातून महादेव जानकर लढणार!

लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागले असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.

मिलिंद संगई, बारामती

Baramati News - लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागले असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. बारामतीत रासपच्या शनिवारी (ता. 10) झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकीत एकमताने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचे निश्चित झाले.

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या सूचनेनुसार बूथ तेथे कार्यकर्ता हे अभियान राबविण्यात येणार आहे. बूथनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कामाचे नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.

मतदारांशी संपर्क साधण्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यमांचा वापर करणे, बूथ समिती स्थापन करणे, रासपचे विचार मतदारांपर्यंत पोहोचविणे, पक्षाची ध्येयधोरणे लोकांना समजून सांगणे अशा बाबी याबैठकीत ठरविल्या गेल्या.

दरम्यान महादेव जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी 17 फेब्रुवारी रोजी फलटण येथे बारामती तालुक्यातून शंभर चार चाकी वाहने कार्यकर्त्यांसह जाणार असल्याची माहिती रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी दिली. महादेव जानकर यांना विजयी करण्यासाठी बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातूनही रासपचे कार्यकर्ते जिवाचे रान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, किरण गोफणे, बारामती तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, शैलेश थोरात, दादा भिसे, महादेव कोकरे, काका बुरूंगले, अॅड. दिलीप धायगुडे, लखन कोळेकर, विजय मोटे, नवनाथ मलगुंडे, दशरथ आटोळे, प्रमोद धायगुडे, अनिवाश मासाळ,शाम घाडगे, किशोर सातकर, प्रकाश देवकाते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT