RTE
RTE 
पुणे

आरटीई प्रवेशासाठी चौथ्या फेरीची पालकांना प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात आरटीई प्रवेशासाठी सुमारे २२ हजार ऑनलाइन अर्ज आले होते. तीन फेऱ्यांनंतर सुमारे एक हजार जागा शिल्लक राहिल्या आहेत. मात्र चौथ्या फेरीबाबत शिक्षण विभागाने कोणतीही घोषणा केलेली नाही. परिणामी, रिक्त जागा भरण्यासाठी प्रवेशाची चौथी फेरी राबवून आरटीईच्या सर्व जागा नियमानुसार भराव्यात, अशी मागणी पालकांमधून होत आहे. 

आरटीईच्या राखीव जागांवर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे बंधनकारक आहे. काही शाळा प्रवेश देण्याबाबत चालढकलपणा किंवा दुर्लक्ष करत आहेत. आरटीईच्या सर्व जागा भरणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारने लोकहिताच्या नावाखाली प्रत्येक फेरीसाठी एक महिन्याच्या कालावधी घेतला. अनेक पालकांना अर्ज करूनही मोबाईलमध्ये मेसेज आलेच नाहीत. त्यामुळे आपोआपच फेऱ्या लांबत गेल्या. तिसऱ्या फेरीनंतर चौथ्या फेरीविषयी कोणताच ठोस निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला नाही. अनेक पालक अजूनही मेसेजच्या प्रतीक्षेत आहेत. 

रिक्त जागांचे सरकार रिक्त जागांचे काय करणार आहे, त्या कोणत्या कोट्यातून भरल्या भरणार आहेत, याविषयी विभागाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. याबाबत अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT