Rupali Thombare Vasant More Sakal
पुणे

Pune News : फक्त पक्ष बदलला, नातं नाही; रुपाली ठोंबरे - वसंत मोरेंची भाऊबीज

रुपाली ठोंबरे यांनी पक्ष बदलल्यानंतर दोघांच्या नात्यात कटुता आली होती.

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीचा उत्साह राजकीय नेत्यांमध्येही पाहायला मिळाला. राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत फराळ केला. तसंच नेत्यांमधले प्रेमाचे, नात्यांचे बंधही इथं दिसून आले. प्रसाद लाड, चित्रा वाघ यांच्यासह वसंत मोरे रुपाली ठोंबरे यांनीही काल भाऊबीज साजरी केली.

रुपाली ठोंबरे पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेचे नेते वसंत मोरे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मनसेत असताना दोघे दरवर्षी भाऊबीज साजरी करत असायचे. रुपाली ठोंबरे यांनी पक्ष बदलल्याने दोघांच्या नात्यात कटुता आली होती. मात्र यंदाच्या भाऊबीजेच्या निमित्ताने ती दूर झाली आहे.

काल पुण्यात दोघांनीही भेटून भाऊबीज साजरी केली. यानंतर आपण तब्बल एका वर्षाने भेटत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. शिवाय दोघांमध्ये आलेल्या कटुतेबद्दलही भाष्य केलं होतं. दोघांनी एकमेकांवर कितीही टीका केली तरी आमचं नातं तुटणार नाही, अशी भावना वसंत मोरे आणि रुपाली ठोंबरे या दोघांनीही व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT