पुणे

क्राईम पट्टा

CD

क्राईम पट्टा
............
अपघातप्रकरणी
चालकावर गुन्‍हा

सातारा : म्‍हसवे (ता. सातारा) येथील डी मार्टसमोर रविवारी सकाळी झालेल्‍या अपघातात कसबा हाराळे (ता. करवीर, जि. कोल्‍हापूर) येथील स्‍नेहल उत्तम कांबळे (वय १७) आणि एकनाथ बापू कांबळे (वय ७५) यांचा मृत्‍यू झाला होता. त्‍यांच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍याप्रकरणी महामार्गालगत धोकादायक स्‍थितीत ट्रक उभा करणाऱ्या बालाजी लक्ष्‍मण घाटे (रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) याच्‍यावर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. याची तक्रार उत्तम एकनाथ कांबळे (रा. कसबा हाराळे) यांनी नोंदवली आहे. यात त्‍यांनी इतरांच्‍या जीवितास धोका होईल, तसेच मालमत्तेचे नुकसान होईल, अशा पद्धतीने पार्किंग लाईट न लावता संशयिताने ट्रक उभा केल्‍याचे म्‍हटले आहे. याचा तपास सहाय्यक निरीक्षक एस. एस. काटकर करत आहेत.
.............
कोंडव्यामध्ये
एकाची आत्‍महत्‍या

सातारा : कोंडवे (ता. सातारा) येथील विशाल मोहनराव गुरव (वय ४४) यांनी रविवारी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. त्‍यांच्‍या आत्‍महत्‍येमागील कारण समजू शकले नाही. याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात झाली असून, तपास सहाय्यक फौजदार माने करत आहेत.
..........
वाढे येथून
दुचाकीची चोरी

सातारा : वाढे (ता. सातारा) येथून चोरट्यांनी ५० हजार किमतीची दुचाकी चोरून नेली. याची तक्रार दीपाली संतोष जाधव (रा. वाढे) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून, तपास हवालदार वायदंडे करत आहेत.
.............
चोरीप्रकरणी
महिलेवर गुन्हा

सातारा : घरकाम करत असताना ४४ हजारांची रोकड चोरून नेल्‍याच्‍या संशयावरून शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात एका महिलेवर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. सुषमा सचिन जाधव (रा. शाहूपुरी) असे गुन्‍हा दाखल असणाऱ्या महिलेचे नाव आहे. याची तक्रार स्‍मिता दीपक भोसले (रा. व्‍यंकटपुरा पेठ, सातारा) यांनी नोंदवली असून, तपास हवालदार खलिपे करत आहेत.
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

Pakistan Water Shortage: पाकच्या हैदराबादमध्ये भीषण पाणीटंचाई; उद्योग क्षेत्र संकटात, उत्पादनावर परिणाम; जनजीवन विस्कळित

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात लागताच फोन, ओमराजेंना काय सांगितलं? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Nagpur: ४२ वर्षीय डॉक्टरनं भुलीचं इंजेक्शन टोचून घेत आयुष्य संपवलं, ५ दिवसांपासून गेले नव्हते घरी

Latest Marathi News Live Update : उत्तर महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळा, SIT च्या तपासात धक्कादायक बाब समोर

SCROLL FOR NEXT