पुणे

बेगमपूर आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांची भेट अत्याधुनिक उपचार सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार

CD

MGV26B15378
बेगमपूर ः जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.

सचिव जाधव यांनी दिली आरोग्य केंद्राला भेट
बेगमपूर ः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक अत्याधुनिक उपचार सेवा सुविधा व पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती नूतन जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांनी बेगमपूर (ता. मोहोळ) येथे दिली. जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर मतदार संघातील वीज, पाणी व रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील समस्या विचारात घेत त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्याचा संकल्प जाधव यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी येथील आरोग्य केंद्राला भेट देत आरोग्य सेवेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे जाधव यांनी येथे उपचारासाठी आलेल्या बेगमपूर येथील कुसुम पोपळे यांच्याशी आरोग्य सेवेबाबत संवाद साधला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली सावंत व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सावंत यांचे हस्ते केंद्राच्यावतीने सचिन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, औषध साठा, उपलब्ध यंत्रसामग्री, मनुष्यबळ व दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत यांच्याकडून माहिती घेतली. बेगमपूर केंद्रांतर्गत बेगमपूरसह येणकी, इंचगाव व सोहाळे या उपकेंद्र असून यात अकरा गावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT