पुणे

साईसमर्थ पतसंस्थेचे बारामतीत उद्‌घाटन

CD

बारामती, ता. ५ : नागरिक, शेतकरी, महिला, युवा उद्योजक आणि व्यावसायिकांना विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बारामतीत साईसमर्थ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेचे उद्‌घाटन नुकतेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्‌घाटन प्रसंगी सारिका भरणे, नगराध्यक्ष सचिन सातव, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, शहराध्यक्ष किरण इंगळे, अविनाश घोलप, सुभाष सोमाणी, पृथ्वीराज घोलप, नगरसेविका सुजाता मलगुंडे, नगरसेवक प्रवीण माने, जयसिंग देशमुख, भारत मोकाशी, डॉ. राकेश मेहता, नीलेश टिळेकर, प्रशांत काटे, प्रशांत सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्थेमार्फत सभासदांना ठेवींवर वार्षिक दहा टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. तसेच सोनेतारण कर्ज ११.७५ टक्के व्याजदराने उपलब्ध होणार असून, तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज तसेच इतर विविध वित्तीय सुविधांचाही लाभ सभासदांना मिळणार आहे.
पारदर्शक व्यवहार, तत्पर सेवा आणि सभासदांचा विश्वास या तत्त्वांवर संस्थेची वाटचाल राहील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष विनोद थोरात यांनी व्यक्त केला.
संस्थेचे सचिव अमोल घोलप यांनी प्रास्ताविक केले. अनिल रूपनवर यांनी सूत्रसंचालन केले.


15619

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT