पुणे

बोधेगाव -''साई सिध्देश'' मध्ये अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप

CD

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन

चौघांविरुद्ध ‘पोक्सो’सह विविध कलमांन्वये गुन्हा

बोधेगाव, ता. १० ः येथील ‘साई सिद्धेश’च्या निवासी होस्टेलमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी जाब विचारल्यानंतर तिच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध ‘पोक्सो‘सह विविध कलमांन्वये शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुशाबा पलाटे, प्रतीक पलाटे, पीयूष पलाटे व प्रणव पलाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक बाजीराव सानप तपास करीत आहेत.

फिर्यादीची नऊ वर्षीय मुलगी १ जूनपासून बोधेगाव येथील ‘साई सिद्धेश’च्या निवासी होस्टेलमध्ये राहत असून, एका विद्यालयात सहावीचे शिक्षण घेत आहे. ८ ऑगस्ट रोजी मुलीने शिक्षकांच्या मोबाईलवरून वडिलांशी संपर्क साधून भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर वडील होस्टेलमध्ये गेले. मुलीने वडिलांना होस्टेलमध्ये घडलेला प्रकार सांगितला. वडील, आई, आजोबा व नातेवाईक होस्टेलमध्ये गेले. तेथे जाब विचारला असता फिर्यादीला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

............

संबंधित प्रकरणात पंचनामा करण्यात आला आहे. फरार आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
— मोहन बोरसे, पोलिस निरीक्षक, शेवगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Scholarship Exam Result : चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT