Diwali-Pahat 
पुणे

‘सकाळ दिवाळी पहाट’मध्ये रंगणार शब्दसुरांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा

परवीन सुलताना यांची २७ रोजी, तर राहुल देशपांडे यांची २८ रोजी मैफल
पुणे - पुणेकरांसाठी रविवार  (ता. २७) पासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून शब्द-सुरांच्या सुरेख मैफलीचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात गाण्यांचा सुरेल नजराणा मिळणार आहे. बेगम परवीन सुलताना आणि राहुल देशपांडे यांच्या सुरेल स्वरांनी ही दिवाळी पहाट सजणार आहे.

पहाटेच्या प्रसन्नवेळी या सूर-तालांनी पुणेकरांची दिवाळी पहाट अजून प्रसन्न होईल. पहाटे साडेपाचला हा कार्यक्रम सुरू होईल.  नरकचतुर्दशीच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. २७) बेगम परवीन सुलताना यांच्या बहारदार गायनाने रसिकांची पहाट स्मरणीय होईल. सोमवारी (ता. २८) राहुल देशपांडे यांच्या स्वरांनी पाडवा पहाट रंगणार आहे.

बेगम परवीन सुलताना या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील स्वरसाम्राज्ञी. मेलडीक्वीन परवीन सुलताना म्हटले की ‘हमे तुमसे प्यार कितना’ हे कुदरतमधील गाणे रसिकांना आठवतेच. त्याचबरोबर ‘कौन गली गयो श्‍याम’ (पाकिजा), ‘ए मुहबत यूं ही तू बदनाम नहीं’ (आशय) अशी अनेक लोकप्रिय गाणी त्यांच्या नावावर आहेत. राहुल देशपांडे यांनी सुरू केलेला ‘वसंतोत्सव’ हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव आहे. त्यांनी संगीत मानापमान या संगीत नाटकाचे पुनरुज्जीवन केले. 

या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी. लि., पावर्ड बाय पल्लोड असून, रिअल इस्टेट पार्टनर श्री राम बिल्डर व निर्माण प्रमोटर्स आहेत. त्याचबरोबर सहप्रायोजक श्री रामकृष्ण ऑइल मिलचे लाकडी घाणा, चितळे डेअरी, वास्तू रविराज आहेत.

कार्यक्रमाचे एज्युकेशन पार्टनर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ट्रॅव्हल पार्टनर किया हॉलिडेज व बेव्हरेज पार्टनर जीएस चहा हे आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. मोफत पास मिळण्याची तारीख व ठिकाणे लवकरच जाहीर केली जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha vs OBC reservation: तर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची मागणी पूर्ण करा, बनराव तायवाडेंची मोठी मागणी! सरकारवर दबाव वाढला

Pune Station Update : पुणे स्थानकावर 'एम यूटीएस' सेवा सुरू; तिकीटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही

Kolhapur Digital Scam : कोल्हापुरातील नामांकित डॉक्टर पिता-पुत्राला ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे ४२ लाखांचा गंडा

'मी माझ्या भावनांना कंटाळलोय..'; चिठ्ठी लिहून 25 वर्षीय कॉम्प्युटर इंजिनीअरनं घेतला गळफास, आयटी कंपनीत करत होता नोकरी

Gold Rate Today: सोनं 3,300 रुपयांनी महागलं; भाव 1 लाख रुपयांच्या पुढे; चांदीच्या भावात मात्र घसरण, कारण काय?

SCROLL FOR NEXT