Hyena and gaur buffalo animals Pune Rajiv Gandhi Zoo  
पुणे

Sakal Exclusive : पुणेकरांना पाहायला मिळणार तरस

तरस आणि गव्याची जोडी लवकरच राजीव गांधी प्राणी संग्रहालयात येणार

अशोक गव्हाणे

कात्रज : नॅशनल झू ऑथॉरिटी आणि महाराष्ट्र राज्य वन खात्याने पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तरस आणि गव्याची जोडी आणण्यासाठी मान्यता दिली आहे. पुण्यात पहिल्यांदाच तरसाची जोडी आणण्यात येणार असून त्याच्यासाठी १५०० चौरसमीटर जागेत खंदकाचे काम चालू आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संग्रहालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना पहिल्यांदाच संग्रहालयात तरस पाहायला मिळणार आहे.

त्याचबरोबर, सद्यस्थितीत संग्रहालयात एक नर गवा पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. त्याच्या जोडीला आता आणखी एक नर आणि मादीची जोडी आणण्यात येणार आहे. प्राणीसंग्रहालयात गव्यासाठी ६ हजार चौरसमीटर जागेत असलेल्या खंदकात ही जोडी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयात आता एक मादी आणि दोन नर होतील. केरळमधील तिरुवनंतपुरमधील त्रिवेंद्रम प्राणी संग्रहालयातून या दोन जोड्या आणण्यात येणार आहेत.

प्राण्यांच्या अदलाबदलीचा नियमाअंतर्गत राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील एक भेकराची जोडी आणि एक आफ्रिकन ग्रे पोपट केरळला देण्यात येणार आहे. तब्बल १६०० किलोमीटरचा प्रवास करत तरस आणि गव्याच्या जोड्या पुण्यात येणार असून ही सर्व अदलाबदलीची आणि वाहतूकीची प्रक्रिया राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे पथक करणार आहे.

पुणे शहरातील पर्यटकांसह आजूबाजूंच्या नागरिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. सद्यस्थितीत पर्यटकांना एखाद्या लांबच्या वन्यजीव पर्यटनस्थळी जाऊन असे प्राणी पाहावे लागतात. त्यामुळे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात तरस आणि गवा पाहता आल्यास पर्यटकांचा खर्च आणि वेळही वाचणार आहे.

पर्यटकांना तरस पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच रानमांजर, वाघाटी आणि शेकरू हे प्राणी पाहायला मिळाले होते. अगदी त्याचप्रमाणे काही कालावधीत आता तरसही पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. पर्यटकांना लवकरच याचा आनंद घेता येणार आहे

- अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bombay High Court : मंत्र्यांची मुले गुन्हे करुन मोकाट फिरतात, तरीही पोलिसांना सापडत नाहीत; मुख्यमंत्री हतबल आहेत? हायकोर्टाची विचारणा

सोलापूर महापालिकेत ‘एमआयएम’ला मिळणार नाही विरोधी पक्षनेतेपद! सोलापूर महापालिकेतील नगरसेवक म्हणतात, ‘उपमहापौरपद नको रे बाबा’, काय आहे कारण? वाचा...

आजचे राशिभविष्य - 23 जानेवारी 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 जानेवारी 2026

‘ई-केवायसी’साठी मुदतवाढ! लाडक्या बहिणींनी ‘ई-केवायसी’ करताना ‘शासकीय नोकरदार’वर केले क्लिक अन्‌ बंद झाले १५०० रुपये; आता अंगणवाडी सेविकांमार्फत फेरपडताळणी

SCROLL FOR NEXT