Bibvewadi Bus Stop sakal
पुणे

Sakal Impact : 'सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे बिबवेवाडीला बस थांबा मिळाला; पालक, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

स्वामी विवेकानंद मार्गाचे सीमेंट काँक्रीटकरण करताना प्रेम नगर सोसायटी, ईएसआय हॉस्पिटल, बिबवेवाडी गावठाण, इंदिरा नगर, अप्पर येथील बस थांबा शेड काढलेले आहेत.

नितीन बिबवे

बिबवेवाडी - स्वामी विवेकानंद मार्गावरील गावठाण चौकात अप्परच्या बाजूला असणारे बस थांबा शेड तीन वर्षापूर्वी काढलेले होते ते बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना उन्हा पावसात रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागत होती. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर पीएमपीएल प्रशासनाने तातडीने दखल घेत गावठाण चौकात नवीन बस थांबा शेड लावले.

स्वामी विवेकानंद मार्गाचे सीमेंट काँक्रीटकरण करताना प्रेम नगर सोसायटी, ईएसआय हॉस्पिटल, बिबवेवाडी गावठाण, इंदिरा नगर, अप्पर येथील बस थांबा शेड काढलेले आहेत. त्यापैकी गावठाण चौकात बस थांबा शेड बसविणे अत्यंत गरजेचे होते. चौकात सहा शाळा असून, परिसरातील सुमारे वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. परंतु बस थांबा शेड नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर किंवा दुकानांच्या आडोशाला उभे राहून बसची वाट पाहत थांबावे लागत होते. अनेक वेळा बस थांब्याच्या जागेवर बस थांबली नाही तर विद्यार्थी चौकातील वाहतूक सिग्नलला बस थांबल्यानंतर जीव धोक्यात घालून बस पकडत होते त्यामुळे अपघात होत होते.

बस थांबा शेड नसल्याबाबत नागरिकांनी 'सकाळ'च्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले, त्याची पीएमपीएल प्रशासनाने तातडीने दखल घेत बस थांबा शेड लावले.

मनिषा मगर (पालक) - बस थांबा शेड लावल्यामुळे मुलांना घेऊन शेड मध्ये सुरक्षित उभे राहता येते, पावसात रस्त्यावर उभे रहावे लागत नाही.

दत्तात्रेय तुळपुळे (मुख्य अभियंता स्थापत्य विभाग, पीएमपीएल) - प्रवासी केंद्रीत सेवा धोरणानुसार शहरात तिनशे नवीन बस थांबे लावण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी बस थांबा शेड तातडीने बसविण्याची गरज व मागणी होती त्यामुळे बस थांबा शेड लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT