Sakal India Foundation sakal
पुणे

Sakal India Foundation : विदर्भातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे नारायण आणि सुधा बनसोड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विदर्भातील एका विद्यार्थ्याला आणि एका विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे नारायण आणि सुधा बनसोड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विदर्भातील एका विद्यार्थ्याला आणि एका विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. त्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील.

बनसोड कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून दरवर्षी या दोन शिष्यवृत्त्या दिल्या जातात. दोन्ही शिष्यवृत्त्या प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या असून, पदवी पूर्ण होईपर्यंत मिळेल. या शिष्यवृत्त्या २०१७-१८ मध्ये सुरू झाल्या आहेत.

कोण अर्ज करू शकतो?

शासकीयदृष्ट्या विदर्भातील जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी तसेच मार्च २०२३ मध्ये बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुविशारद, नर्सिंग, विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

असा करावा अर्ज

पात्र विद्यार्थ्यांनी अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई- मेल यांचा उल्लेख करावा. सोबत बारावीची गुणपत्रिका, पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला यांची झेरॉक्स प्रत जोडावी. शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत असेल.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता

सकाळ इंडिया फाउंडेशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२. दूरध्वनी क्रमांक : ०२० - ६६०३५९३५ - ई-मेल sakalindiafoundation@esakal.com किंवा contactus@sakalindiafoundation.org

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT