sakal-relife-fund.jpg
sakal-relife-fund.jpg 
पुणे

'सकाळ रिलीफ फंडा'ने ओलांडला 84 लाखांचा टप्पा 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी हजारो हात उत्स्फूर्तपणे सरसावल्यामुळे "सकाळ रिलीफ फंडा'ने तब्बल 84 लाख रुपयांच्या निधीसंकलनाचा टप्पा शनिवारी ओलांडला. समाजातील विविध घटकांकडून पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी 'सकाळ'च्या कार्यालयात नागरिकांची रिघ कायमच आहे. 

सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह विविध भागांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी "सकाळ रिलीफ फंडा'कडून निधी संकलन सुरू आहे. त्याला 'सकाळ'च्या विविध कार्यालयांत नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लहान व्यावसायिक, व्यापारी ते मोठ्या उद्योजकांपर्यंतचे घटक त्यात सहभागी झाले आहेत. खाऊच्या पैशातील काही रक्कम शालेय विद्यार्थी पूरग्रस्तांसाठी देत आहेत; तर महाविद्यालयीन विद्यार्थी विविध ठिकाणी काम करून त्यातून मिळणारे पैसे देत आहेत. काही चित्रकारांनी चित्रांच्या प्रदर्शनातून जमा झालेले उत्पन्न "सकाळ रिलीफ फंडा'कडे जमा केले आहेत.

समाजातील या घटकांच्या बळावरच 'सकाळ'ने 84 लाख रुपयांच्या निधीसंकलनाचा टप्पा शनिवारी पार केला. वकील, डॉक्‍टर, चार्टड अकाउंटंट, बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्‍ट आदी विविध घटकांच्या संघटनाही सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून निधीसंकलनाच्या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. सार्वजनिक मंडळेही सहभागी झाली आहेत. पूरग्रस्तांचे संसार उभे राहावेत आणि त्यांना आवश्‍यक ती तातडीची मदत मिळावी, यासाठी 'सकाळ'तर्फे डाळ, तांदूळ, आटा तसेच इतर अन्नधान्यांचा समावेश असणारे "किट', औषधे, संसारोपयोगी साहित्य पाठविले आहे. पुणे आणि मुंबईतूनही ही मदत पाठविली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT