jahirnama-jantecha.jpg
jahirnama-jantecha.jpg 
पुणे

#PunekarDemands : जनतेचा जाहीरनामा, हाच आमचा जाहीरनामा ! (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पुणे : वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने राजकीय पक्षांकडे शनिवारी सुपूर्द करण्यात आला. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आदींच्या प्रतिनिधींनी त्यातील मुद्‌द्‌यांचा समावेश त्यांच्या-त्यांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याची एकमुखाने ग्वाही दिली. तत्पूर्वी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी जनतेच्या जाहिरनाम्याबाबतची भूमिका आणि राजकीय पक्षांकडूनच्या अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केल्या.

वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती, कौशल्या, कायदा सुव्यवस्था, नगर नियोजन, गृहनिर्माण आदी विविध क्षेत्रांवर आधारित पुणेकर नागरिक आणि तज्ज्ञांच्या मदतीने सकाळने 'जनतेचा जाहीरनामा' तयार केला आहे. सकाळमधून या पूर्वीच तो विस्तृत स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचे हस्तांतर तज्ज्ञांनी आज राजकीय पक्षांकडे सुपूर्द केला. राजकीय पक्षांनी जनतेच्या जाहिरनाम्याची दखल घेऊन त्यांतील मुद्दे त्यांच्या जाहिरनाम्यात समाविष्ट करावे, असे अपेक्षित आहे.

ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनचे शहर प्रमुख महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, भाजपतर्फे सरचिणीस उज्वल केसकर, र्रावादी काँग्रेसतर्फे समन्वयक प्रदीप देशमुख, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे तसेच, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, राजेश येनपुरे, योगेश समेळ, रविंद्र धंगेकर, प्रशांत बधे, लोकसभा निवडणूकीतील भाजपचे उमेदवार गिरीश बापट आदी उपस्थित होते. नगर नियोजनकार अनघा परांजपे पुरोहित, सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासक प्रांजली देशपांडे आगाशे, रेल्वेच्या अभ्यासिका हर्षा शहा, निवृत्ती अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरेश कमलाकर, निवृत्त निरीक्षक विजय सोनुने, सॅसकॉमचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर आदी उपस्थित होते.

सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी, ''प्रशासन आणि राजकीय पक्षांकडून असलेल्या जनतेच्या अपेक्षांचा समावेश राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात व्हाव्यात, या उद्देशाने सकाळने हा उपक्रम आयोजित केल्याचे प्रास्ताविकात सांगितले. मुख्य वार्ताहर संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर, प्रिन्सिपल कॉरसपॉन्डंट मंगेश कोळपकर यांनी आभार मानले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT