Sakal-Tourism-Expo
Sakal-Tourism-Expo 
पुणे

सकाळ टुरिझम एक्‍स्पोला प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑस्ट्रेलिया की रशिया, थायलंड की न्यूझीलंड... आपण आइसलॅंडलाच जाऊया का... अशी अनेक वाक्‍ये ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो २०१९’ या प्रदर्शनात ऐकायला मिळत होती. देशी-परदेशी पर्यटनाची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे या प्रदर्शनाला शहरासह पिंपरी व जिल्ह्यामधील नागरिकांनी शनिवारी प्रचंड प्रतिसाद दिला. पर्यटनाबद्दल हवी असलेली माहिती मिळविण्यासाठी रविवारी (ता. ३) अखेरची संधी आहे.

राजस्थान, केरळ, अंदमान, लेह-लडाख, जम्मू काश्‍मीरपासून कन्याकुमारी, अमेरिका, मलेशिया, युरोप, बाली आदी देशांतील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पर्यटनस्थळाची माहिती, हॉटेलचे आरक्षण, विमान- रेल्वे प्रवासाची सुविधा, हवामान आदींची माहिती अनेकजण विचारत होते. 

अनेक पर्यटन कंपन्यांनी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजला प्रतिसाद मिळत होता. मास्टर टूर ऑर्गनायझेशन, कॉक्‍स ॲण्ड किंग, ॲडलॅब इमॅजिका, मेक माय ट्रीप, गिरीकंद टॅव्हल्ससारखे तीसहून अधिक पर्याय मिळत असल्याने पर्यटक खूष झाले होते. अनेकजण सवलतींसाठी ‘स्पॉट बुकिंग’ही करीत होते. 

पर्यटनासाठी ‘सीझन’ ही संकल्पना होती. पण, आता ती कमी झाली असून मुलांच्या सुट्या आणि नोकरदारांच्या वेळांवर सर्वकाही अवलंबून असते. अंदमान-निकोबार बेटावर जाण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा काळ होता. आता उन्हाळ्यासाठीही पर्यटकांनी विविध बेटांवर जाण्यासाठी नोंदणी केली आहे.
- नीलेश गायकवाड, कॅप्टन 

या एक्‍स्पोमुळे आम्हाला पर्यटकांशी संवाद साधता आला. जम्मू आणि काश्‍मीर म्हटले, की युद्ध आणि लढाई अशी लोकांची मानसिकता असते. पण, यातून सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ऐतिहासिक स्थळांपासून निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांनी जम्मू काश्‍मीरला भेट द्यावी. 
- शफाकत अहमद, जम्मू आणि कश्‍मीर पर्यटन अधिकारी

आम्ही आतापर्यंत १० स्टॉलला भेटी दिल्या. कंबोडिया, ग्रीनलॅंड आदी ठिकाणांबाबत माहिती घेतली. 

प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या तारखा आणि बजेटची माहिती घेऊन आम्ही त्यानुसार कोणत्या देशात फिरायला जायचे, हे ठरविणार आहोत. आम्ही ज्येष्ठ नागरिक असल्याने काही मर्यादा येतात; पण त्यातही आम्ही फिरण्याचा आनंद घेत असतो. 
- आनंद शिरूर आणि वीणा पर्यटक, शिरूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT