गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट - ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’मध्ये रविवारी विविध ठिकाणांची माहिती घेण्यासाठी पर्यटकांची झालेली गर्दी.
गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट - ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’मध्ये रविवारी विविध ठिकाणांची माहिती घेण्यासाठी पर्यटकांची झालेली गर्दी. 
पुणे

पर्यटनस्थळांच्या बुकिंगला प्रचंड प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

पुणे - युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि ग्रीसमधील आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी तसेच, देशांतर्गत पर्यटनासाठी विविध पर्यटनस्थळांच्या सवलतीमधील ‘बुकिंग’ला रविवारी पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

रविवारचा सुटीचा दिवस अन्‌ ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’ प्रदर्शनाचीही अखेरचा दिवस असल्याने पर्यटन कंपन्यांच्या स्टॉल्सवर सकाळी दहा वाजल्यापासूनच पर्यटकांनी गर्दी केली होती. यात अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्याने पर्यटनासाठी मुबलक पर्याय उपलब्ध झाले होते. पर्यटक त्यांचे बजेट आणि तारखा मॅच करत पर्यटनस्थळांची माहिती घेत होते. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांसह जम्मू काश्‍मीर, राजस्थान, लेह लडाखला कुटुंबासह जाण्यासाठी पर्यटक वेगवेगळ्या स्टॉलला भेटी देऊन तुलना करत होते. स्पॉट बुकिंगसाठी कंपन्यांनी विशेष सवलती जाहीर केल्यामुळे पर्यटकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. जेंटिग क्रुझेसवर जाण्यासाठी नागरिक अधिक उत्सुक असल्याचेही दिसत होते. या एक्‍स्पोचे मास्टर टूर्स ऑर्गनायझर्स प्रा. लि. हे टायटल स्पॉन्सर असून, पॉवर्ड बाय गिरीकंद ट्रॅव्हल प्रा. लि. हे आहेत. सनीज्‌ वर्ल्ड, क्‍वेस्ट टूर्स, कॅप्टन नीलेश गायकवाड हे सहप्रायोजक आहेत. जम्मू ॲण्ड काश्‍मीर टुरिझमसह सुमारे ३० पर्यटन कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या.

दरवर्षीप्रमाणे ‘क्‍वेस्ट टूर्स’ला ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’मध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, चारधाम, दुबई, युरोप या सहलींसाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात माहिती घेतली. 
- केदार साठे, क्वेस्ट टूर्स

‘सकाळ’ने आयोजित केलेल्या प्रत्येक एक्‍स्पोमध्ये आम्ही सहभाग घेत असतो. प्रदर्शनानंतर आमच्याकडे खऱ्याअर्थाने बुकिंगला सुरवात होते. त्यात विशेष सवलती आणि ऑफर्समुळे पर्यटकांना सोयीनुसार पॅकेज निवडता येते. पासपोर्ट प्रक्रिया सोपी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय टूर्ससाठी कल वाढत आहे.  
- अखिलेश जोशी, गिरिकंद ट्रॅव्हल प्रा. लि. 

पूर्वी पर्यटन म्हणजे एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी समजली जायची; पण नोकरदार वर्गाचा ताणतणाव पाहता रिलॅक्‍स होण्यासाठी ते देशांतर्गत टूर तरी नक्की बुक करतात. 
- अजित सांगळे, एसटीए हॉलिडेज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT