Sakal-Vastu-Expo
Sakal-Vastu-Expo 
पुणे

‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आजपासून

सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रत्येकाला स्वत:च्या हक्काच्या घरात राहायचे असते; पण मनासारखे घर कुठे घ्यावे, या प्रश्‍नाचे उत्तर देणाऱ्या ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’चा प्रारंभ आज (ता. १६) होत आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेला हा एक्‍स्पो ता. १६ व १७ रोजी हॉटेल प्राइड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर येथे होत आहे.

यामध्ये परवडणाऱ्या घरांची मोठी शृंखला सादर केली जाणार आहे. याशिवाय, लक्‍झ्युरियस घरांचीही माहिती मिळणार आहे. परवडणाऱ्या घरांपासून आलिशान घरापर्यंत सर्व काही, शिवाय घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज्‌, लोकेशन, आसपासचा परिसर अशा सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरणार आहे. 

या एक्‍स्पोमध्ये ३० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १५० हून अधिक प्रकल्पांची माहिती उपलब्ध होणार आहे. पुण्याच्या चौफेर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांची सविस्तर माहिती इथे मिळणार आहे. घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज्‌, लोकेशन, आसपासचा परिसर अशा सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरणार आहे. 

कोणत्या प्रकल्पांमधून कोणत्या सुविधा मिळणार, कोणत्या ठिकाणी पैसे गुंतविणे जास्त फायद्याचे राहू शकते, तेथील परिसराचा विकास कसा होतो आहे, अशा विविध प्रश्‍नांसोबतच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्याला पाहता येणार आहेत. 

तुमचे बजेट, इच्छा, आवड, सोय अशा प्रत्येक प्रश्‍नाचे योग्य उत्तर या एक्‍स्पोमधून मिळू शकते, त्यामुळे हा एक्‍स्पो तुमच्या मनातील घर पूर्ण करण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.

प्रवेश विनामूल्य
 कधी : १६ व १७ फेब्रुवारी २०१९
 कुठे : हॉटेल प्राइड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर
 वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT