Sakal Vastu Expo 2022
Sakal Vastu Expo 2022 Sakal
पुणे

फ्लॅट खरेदीचे बहुपर्याय एकाच छताखाली; ७५ पेक्षा जास्त प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा

फ्लॅट, प्लॉट, बंगलो, रो हाउस कार्यालये आदी गोष्टींसाठी पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.

पुणे - फ्लॅट, प्लॉट, बंगलो, रो हाउस कार्यालये आदी गोष्टींसाठी पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. ज्यांना घर घ्यायचं आहे, त्यांना बरेच पर्याय आहेत. तसेच ज्यांना भांडवल गुंतवायचे आहे, त्यांच्यासाठी देखील ही उत्तम संधी आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे आयोजन माऊली मंगल कार्यालय बाणेर याठिकाणी करण्यात आले आहे.

वीस पेक्षा जास्त विकासकांनी ग्राहकांच्या स्वप्नपूर्तीसाठी तयार केलेली ७५ पेक्षा जास्त प्रोजेक्टमधील नावीन्यपूर्ण घरे याठिकाणी पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी (प्राइम लोकेशनवर) उदा. औंध, बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, शिरगाव, पिंपरी, भूगाव, भुकूम, धायरी, न्यू.हिंजवडी, सिंहगड रस्ता याठिकाणी प्रॉपर्टी असल्याने जवळपास शाळा, किराणा दुकाने, मेडिकल, हॉस्पिटल, मॉल, चित्रपट गृह, महत्त्वाचे रस्ते उद्या (मुंबई हायवे) आदी सुविधा उपलब्ध आहेत.

विकासकांना या क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असल्याने नागरिकांच्या मागणीचा विचार करून घरांचे उभारणी करण्यात आलेली आहे. प्रदर्शनात खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी, बुकिंगसाठी रक्कम कमी, प्रॉपर्टीचा ताबा मिळाल्यानंतरच हप्ता सुरू. लगेच बुकिंग केल्यास गाडी, सोन्याचे नाणे बक्षीस, बुकिंगवर ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या वल्ड कप क्रिकेट मॅच तिकीट फ्री, मॉड्युलर किचनसाठी सुविधा, पुण्यात एक फ्लॉट बुक केला तर सोलापूरमध्ये एक प्लॉट फ्री अशा अनेक सुविधा एकाच छताखाली मिळण्याची मोठी संधी या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे.

स्टॅम्प ड्यूटी, रजिस्ट्रेशन, जीएसटीमधून सूट, अनेक बॅंकांचे जागेवर तत्काळ कर्ज सुविधा उपलब्ध, प्रदर्शनापासून संबंधित प्रॉपर्टी प्रत्यक्ष पाहण्यासाठी जाता येणार, बुकिंगनंतर ताबा लवकर मिळणार, प्रॉपर्टीच्या जागेचा सुनियोजित वापर, अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे, पुणे शहरापासून अगदी तीस मिनिटांच्या अंतरावर खेड-शिवापूर, वाघोली या परिसरातील एन प्लॉट, कार्यालयासाठी व्यावसायिक (कमर्शिअल) प्रॉपर्टी, गुंतवणूकदारांना मोठी संधी यामध्ये निर्माण झाली आहे.

पहिल्याच दिवशी ग्राहकांची प्रचंड गर्दी

औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात पहिल्यांदाच होत असलेल्या ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला या परिसरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवार (ता. ४) सकाळी अकरा वाजल्यापासून प्रदर्शन पाहण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

वीसपेक्षा जास्त विकसक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. ग्राहकांना व्यवस्थित समजेल, अशी माहिती विकसकांच्या टीमकडून दिली जाते. वातानुकूलित कार्यालयात प्रदर्शन पाहायला येणाऱ्या ग्राहकांना मनमोकळेपणाने आपल्या घराची निवड करता येत आहे. मोफत प्रवेश, सुसज्ज वाहनतळ यामुळे ग्राहक बिनधास्त खरेदीसाठी माहिती घेत आहेत. स्टॉलधारकांनी ग्राहकांसाठी खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स ठेवल्या आहेत. ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध असलेले अनेक पर्याय, तत्काळ, माफक व्याजदरात कर्ज पुरवठ्याची सोय, अशा अनेक सुविधा नागरिकांना एकत्र मिळत आहेत.

पुणे शहराच्या पूर्व, दक्षिण भागात प्रदर्शन आयोजित करण्यात येत होते. परंतु, आता पहिल्यांदाच बाणेर बालेवाडी भागात असे प्रदर्शन भरविण्यात आले आहे, ही चांगली बाब आहे. ग्राहक आणि व्यावसायिक दोघांनाही एकाच ठिकाणी घर खरेदी व विक्रीसाठी चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

- पराग मेहता, रिअ‍ॅलिटी प्लस सीओओ, रिमॅक्स व्ही.२१

‘सकाळ’च्या प्रत्येक वास्तू प्रदर्शनात आम्ही सहभागी होतो. यामध्ये नेमके ग्राहक भेटतात आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो. आम्ही रास्त दर प्रस्ताव देतो, त्यामुळे ग्राहक प्रदर्शनानंतर प्रत्यक्ष साइटवर घर पाहायला येऊन बुकिंगसुद्धा करतात.

- अमित जिनराळकर, व्यवस्थापक, परांजपे स्कीम्स

मी औंधचा रहिवासी असून, हे प्रदर्शन जवळ आयोजित केल्याने आमच्यासाठी खूप सोईस्कर झाले. मी याच भागात गुंतवणुकीसाठी सदनिका पाहतोय.

- रमेश जिंतीकर, औंध

मला जमीन घेण्यात रस आहे. या प्रदर्शनात मला प्लॉट्सची माहिती मिळाली. इथे प्लॉटपेक्षा फ्लॅटसंदर्भात जास्त माहिती उपलब्ध असल्याचे दिसते आहे.

- अशोक चासकर, बाणेर

माझं स्वतःचं घर आहे. परंतु, बाणेर, बालेवाडी भागातील गुंतवणुकीच्या अनेक संधी मला ‘सकाळ वास्तू’ प्रदर्शनातून एकाच छताखाली समजल्या.

- विनायक शिंदे, रहिवासी

मी मूळचा सोलापूरचा असून, मुलगा व सुनेला पुण्यात स्थायिक होण्यासाठी घर पाहत आहोत. या प्रदर्शनात उपयुक्त माहिती मिळाली. मजबूत बांधकाम, उंच छताचे सुटसुटीत आणि प्रकाशमय घर हे सर्वांच्या पसंतीस उतरते. कमी खोल्या असाव्यात, परंतु वापरासाठी पुरेशी जागा (कार्पेट एरिया) आणि बाथरूम सुटसुटीत बांधण्यास बिल्डरांनी प्राधान्य द्यावे, असेच सर्व रहिवाशांना वाटत असते.

- आर. एस. नाईक, सोलापूर

बाणेर, बालेवाडी, वाकड या भागांत मी घर शोधतो आहे. इथे काही बिल्डरकडून खूप चांगली माहिती मिळाली आहे, तसेच गृहकर्जाबद्दलसुद्धा माहिती मिळाली आहे.

-कार्तील खेडुलकर, पिपळे निलख

आम्ही बऱ्याच दिवसांपासून फ्लॅट शोधतो आहे; पण हवा तसा फ्लॅट मिळत नाही. त्या दृष्टीने बाणेर येथे ‘सकाळ’ने भरवलेले हे प्रदर्शन नक्कीच उपयोगी आहे.

- पल्लवी शर्मा, बाणेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT