Sakal Vastu Expo 2023 Sakal
पुणे

Sakal Vastu Expo 2023 : घर घेण्याची संधी; एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्प

पुणे शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहरीकरणामुळे घरांची मागणीही वाढत चालली असून चांगल्या ठिकाणी, निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त घर प्रत्येकाला हवे आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहरीकरणामुळे घरांची मागणीही वाढत चालली असून चांगल्या ठिकाणी, निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त घर प्रत्येकाला हवे आहे.

पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विविध प्रकारची खरेदी आवर्जून केली जाते. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘वास्तू एक्स्पो’चे शनिवार (ता. २२) आणि रविवारी (ता. २३) कर्वेनगर येथे आयोजन केले आहे. एकाच छताखाली नामांकित बांधकाम व मोठे गृहप्रकल्प पुणेकरांना पाहायला मिळणार असून घर खरेदीसाठी ही एक मोठी संधी आहे.

विविध भागांतील गृहप्रकल्पांची माहिती देणारे या विषयातील तज्ज्ञ ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये उपस्थित राहणार आहेत. पुणे शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहरीकरणामुळे घरांची मागणीही वाढत चालली असून चांगल्या ठिकाणी, निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त घर प्रत्येकाला हवे आहे. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून ‘सकाळ’ने ‘वास्तू एक्स्पो’ चे आयोजन केले आहे.

स्थायिक होण्यासाठी नोकरदार, व्यावसायिकांसह इतर अनेक नागरिक पुणे शहराला पसंती देत आहेत. शहराचे ऐतिहासिक महत्त्व, आजूबाजूला असलेलं पर्यावरण, शिक्षण, आयटी हब इतर सुविधांमुळे पुणे शहराचे महत्त्व वाढते आहे. घरातील सदस्यांची संख्या वाढल्याने मोठ्या व प्रशस्त घराची गरज वाढली आहे. शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी याच ठिकाणी नोकरी करून स्थायिक होताना दिसत आहेत. त्यामुळे स्वतःचे घर खरेदी करावे, असे अनेकांचे स्वप्न असते. तसेच, सुखसुविधा, प्रशस्त घर असावे अशी अपेक्षा असते. त्यासाठीच ‘सकाळ’ने नामांकित बांधकाम व्यावसायिकांना सोबत घेऊन ‘वास्तू एक्स्पो’चे आयोजन केले आहे.

घर घेण्यासाठी अनुकूल वेळ

  • आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सरकारने रेडिरेकनरचे दर वाढविले नाहीत

  • रेडिरेकनरचे दर न वाढल्याने घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्काची जुन्या दरानेच आकारणी

  • रेडिरेकनर दर व मुद्रांक शुल्कात वाढ नसल्याने घरांच्या किमती स्थिर

  • बँकांकडून कर्ज सुविधा उपलब्ध

‘एक्स्पो’मध्ये काय?

  • शहर परिसरातील नामांकित व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

  • एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार

  • वन बीएचकेपासून थ्री, फोर बीएचके, प्लॉट, व्यावसायिक (कमर्शिअल स्पेस) ऑफिस, घरांची माहिती मिळणार

एक्स्पोविषयी...

कुठे : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर पुणे

कधी : शनिवार (ता. २२) व रविवार (ता. २३)

केव्हा : सकाळी १० ते रात्री ९ (दोन्ही दिवस)

सुविधा : प्रवेश व पार्किंग विनामूल्य

संपर्क : ७७२२००१०९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT