Sakal-Vidya
Sakal-Vidya 
पुणे

आजपासून ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे उद्यापासून (ता. ७) रविवारपर्यंत (ता. ९) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग असेल.

प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित केले आहे. या एक्‍स्पोचे मुख्य प्रायोजक युनिक ॲकॅडमी, उप-प्रायोजक मराठवाडा मित्रमंडळ आणि झील एज्युकेशन सोसायटी व सहप्रायोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, संदीप युनिव्हर्सिटी हे आहेत.

कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, फार्मसी, अभियांत्रिकी, आयटी, हेल्थकेअर, फॅशन डिझायनिंग, व्होकेशनल कोर्सेस आदी विविध क्षेत्रांतील करिअर, त्यातील संधी याविषयीची माहिती, तसेच अनेक संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांबद्दल माहिती स्टॉलद्वारे विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे.

आठ प्रसिद्ध वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी आवर्जून सहभागी व्हावे, अशी ही संधी आहे. प्रवेश विनामूल्य असून अधिक माहितीसाठी ९९२२९१३५१०, ९९२३६४५६७९ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज होणारे मार्गदर्शनपर सेमिनार
वक्ते - सुहास कोकाटे
केव्हा - सकाळी ११.०० वाजता
विषय - की टू सक्‍सेस इन्‌ कॉम्पिटिटिव्ह एक्‍साम
विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा. तसेच, विविध स्पर्धा परीक्षा जसे एमपीएससी, टॅक्‍स असिस्टन्स, तलाठी, मेगा भरती यांची माहिती, या परीक्षांची तयारी कशी करावी. 
कोणासाठी उपयुक्त - स्पर्धा परीक्षा देणारे, स्पर्धा परीक्षांसाठी उत्सुक असणारे सर्व विद्यार्थी.

वक्ते - हेमचंद्र शिंदे
केव्हा - संध्याकाळी ६.०० वाजता
विषय - वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया
वैद्यकीय, अभियांत्रिकीला प्रवेश घेताना ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे, कागदपत्रांची पडताळणी तसेच प्रेफरन्स फॉर्म कसा भरावा, पर्सेंटाईल म्हणजे काय याविषयीची माहिती.
कोणासाठी उपयुक्त - वैद्यकीय, अभियांत्रिकीला जाणारे व उत्सुक असणारे सर्व विद्यार्थी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT