sakal vidya education expo 2022
sakal vidya education expo 2022 sakal
पुणे

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’मध्ये करिअरच्या १०० हून अधिक संधी

सकाळ वृत्तसेवा

दहावी-बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे - दहावी-बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३ ते ५ जून दरम्यान गणेश कला क्रिडा रंगमंच येथे होणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या १०० हून अधिक संधींची माहिती एकाच छताखाली मिळेल.

पुण्यासह राज्यातील ३० हुन अधिक नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. यात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केली जाणार आहेत. तसेच, कनिष्ठ महाविद्यालयापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळणार आहे.

महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध असणाऱ्या पर्यायाची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, एव्हिएशन, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येईल. त्याचबरोबर सीईटीसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व शैक्षणिक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने हे प्रदर्शन शिक्षण संस्था आणि विद्यार्थी-पालक यांच्यातील दुवा ठरणार आहे. विश्वकर्मा युनिर्व्हसिटी प्रस्तुत ‘सकाळ विद्या एक्स्पो २०२२’ ला सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिर्व्हसिटीचे सौजन्य आहे. तर, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिर्व्हसिटी आणि सृजन कॉलेज ऑफ डिझाईन यांचे सहयोग सौजन्य आहे.

तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  • ३ जून - ‘एपीजी लर्निंग’चे निनाद पानसे, अजिंक्य डी. वाय. पाटीलचे राहुल मनोहर.

  • ४ जून - सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिर्व्हसिटीचे सागर भडंगे, सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडीया, सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संतोष रासकर.

  • ५ जून - विश्वकर्मा युनिर्व्हसिटीचे डॉ. उमेश पटवर्धन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT