Sakal Vidya Education Expo 2023 sakal
पुणे

Sakal Vidya Expo : शिक्षणातील संधींचा आजपासून महोत्सव; विद्यार्थ्यांना तीन दिवस मार्गदर्शन

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३’चे शुक्रवारी (ता. ९) उद्‍घाटन होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला असतानाच विद्यार्थी-पालकांना वेध लागतात ते करिअरची नेमकी दिशा ठरविण्याचे. त्यांना गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. या महत्त्वाच्या टप्प्यावर ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३’चे शुक्रवारी (ता. ९) उद्‍घाटन होत आहे. हे शैक्षणिक प्रदर्शन रविवार (ता. ११) पर्यंत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजिले आहे.

चाणक्य मंडल परिवार प्रस्तुत या एक्स्पोसाठी एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे प्रायोजकत्व आहे. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मंगेश कराड, सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, एमआयटी डब्ल्यूपीयु विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष संजय चोरडिया, मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, अभिनेत्री डॉ. इलाक्षी गुप्ता उपस्थित राहणार आहे.

राज्यातील नामांकित शिक्षण संस्था प्रदर्शनात सहभागी होतील. यात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती आणि मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजिली आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांपासून कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळणार आहे.

वाईल्डक्राफ्टची बॅग

प्रदर्शनासह विविध चर्चासत्रांना उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना लकी-ड्रॉद्वारे वाईल्डक्राफ्टची बॅग भेट देणार आहे. प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र लकी-ड्रॉ काढण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे.

सकाळ लॉ सिंपोजियम

शनिवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता ‘सकाळ लॉ सिंपोजियम’चे उद्‍घाटन होईल. या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आणि मुंबई विद्यापीठातील ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे संचालक आणि अभिनेते योगेश सोमण उपस्थित राहणार आहेत.

आर्किटेक्ट सिंपोजियम

आर्किटेक्ट क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी आणि उद्योगाच्या स्वरूपासंदर्भात जाणून घेण्यासाठी ‘सकाळ आर्किटेक्ट सिंपोजियम’ आयोजित केली आहे. रविवारी (ता. ११) दुपारी तीन वाजता उद्‍घाटन होणार आहे.

आजचे व्याख्याते व विषय :

सकाळी ११ वा. : अविनाश धर्माधिकारी (दहावी-बारावीनंतरच्या करिअरची संधी)

दुपारी २ वा. : विवेक वेलणकर (कॉमर्समधील करिअरच्या संधी)

दुपारी ३:३० वा. : प्रा. गोविंद घुले (मर्चंट नेव्हीमधील करिअर संधी)

संध्याकाळी ५ वा. : अंकित भार्गव (चॅट-जीपीटीचा प्रभावी वापर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT