Sakal-Vidya
Sakal-Vidya 
पुणे

कॉलेजचा पसंतीक्रम काळजीपूर्वक द्यावा - मीनाक्षी राऊत

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘दहावीच्या निकालापूर्वीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागाची माहिती भरून झालेली आहे. भाग दोनची माहिती भरताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आवडत्या कॉलेजचा पसंतीक्रम द्यावा. अन्यथा प्रत्येक फेरीला थांबण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. विद्यार्थ्यांनी स्वत:चे गुण आणि संबंधित कॉलेजचा कटऑफ लक्षात घेऊन अर्जाची पूर्तता करावी,’’ असा सल्ला पुणे शिक्षण विभागाच्या प्रभारी उपसंचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिला.

निगडी - प्राधिकरणातील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सभागृहात ‘सकाळ विद्या’ व एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्सच्या वतीने ‘अकरावीचा ऑनलाइन प्रवेश व महाविद्यालयाची निवड’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. 

राऊत म्हणाल्या, ‘‘मागील पाच वर्षांपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून सगळ्या प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना मिळत आहे. अर्ज भरण्यासाठी प्रवेशप्रक्रिया माहितीपुस्तिका नीट वाचा, समजून घ्या. प्रवेश प्रक्रियेच्या भाग दोनला आता लवकरच सुरवात होईल. त्यात मुलांना किमान एक आणि कमाल १० पसंतीक्रम भरता येतील. ही प्रवेश प्रक्रिया फक्त महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मुलांकरिताच आहे. पहिल्या फेरीत पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यावरही सहभागी न झाल्यावर त्यांना ब्लॉक करता येते.’’

प्रा. सुधीर भोसले म्हणाले, ‘‘पहिल्या भागात काही चूक, दुरुस्ती आढळल्यास शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रात जाऊन अर्जात दुरुस्ती करून घ्या. अर्जाचा पहिला भाग भरून झाल्यानंतर शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित (अप्रूव्ह) करून घ्या. प्रमाणित अर्जाची प्रत घेऊन ती सांभाळून ठेवा. अर्ज प्रमाणित करून न घेतल्यास ते अपूर्ण (पेंडिंग) समजण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पुढील प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी शाखेची निवड करायची आहे, त्यांना बायोफोकलची निवड करता येत नाही. ‘झिरो राउंड’मध्ये इनहाउस, अल्पसंख्याक आणि मॅनेजमेंटचा कोटा भरण्यात येतो. मुलांनी आसन क्रमांक व्यवस्थित भरला पाहिजे. त्यानंतर स्टेटसमध्ये ‘अप्रूव्ह’ असा उल्लेख दिसत असल्याची खात्री करा. अर्ज प्रमाणित करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे सोबत ठेवा.’’

प्रा. आशिष दुबे म्हणाले, ‘‘अकरावी करिअरचा पाया आहे, मात्र त्याकडेच दुर्लक्ष करतो. अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पडेपर्यंत सात महिन्यांचा कालावधी अभ्यासासाठी मिळतो. त्यानंतर सीईटी द्यायची बारावीचा अभ्यास करायचा यात द्विधा मनःस्थितीत मुले सापडतात. त्यामुळे मुलांनी वेळेचा सदुपयोग करावा. सायन्सच्या पीसीएमबी ग्रुपची निवड करा, त्यात मॅथ्स वगळू नका, कारण मॅथ्स फिजिक्‍सची भाषा आहे. ‘क्रॅशकोर्स’च्या फंद्यात पडू नका, कारण सीईटीला निगेटिव्ह मार्किंग नाही. पण नीट, जेईई मेन्स परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे.’’  डॉ. दिलीप देशमुख, ‘‘पालकांना आपल्या पाल्याची इत्थंभूत माहिती असली पाहिजे, त्यांनी त्याला ओळखले पाहिजे. तो कशात आणि कधी करिअर सुरू करेल याची खात्री पालकांना असली पाहिजे. पाल्यांनी आपला ‘गोल’सेट करणे आवश्‍यक आहे, त्यानंतर त्याचा पाठलाग केला पाहिजे. दहावीत मिळालेल्या गुणांवर शाखेची निवड करून नका. स्वत:ची आवड, निवड आणि क्षमता ओळखा.’’ पीसीसीईओचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुबोध गलांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT