पुणे

तळेगावची साक्षी महसूल सहाय्यक पदी

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ९ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील साक्षी दत्तात्रेय शिंदे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून ‘महसूल सहाय्यक’ पदावर निवड झाली आहे. निवडीनंतर साक्षी हिचा मान्यवरांनी सत्कार केला आहे.
साक्षीचे प्राथमिक शिक्षण तळेगाव ढमढेरे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले असून, स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेत माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण झाले आहे. तळेगाव दाभाडे येथील वसंत दादा पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये बीएससी ॲग्रीची पदवी साक्षीने घेतली आहे. पदवीचे शिक्षण घेत असतानाच साक्षीने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करून महसूल विभागात सहाय्यक पदावर झेप घेतली आहे. साक्षीच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. साक्षीची आई सपना शिंदे या ग्रामसेवक म्हणून सध्या सेवेत आहेत. वडील शेती व्यवसाय करीत आहेत.

मी शेतकऱ्याची मुलगी असून, आजोबा, आईवडील व गुरुजनांनी केलेले मार्गदर्शन तसेच जिद्द, चिकाटी व वाचन या त्रिसूत्रीमुळे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले. आगामी काळातही उच्च पदासाठी स्पर्धा परीक्षा देणार आहे. - साक्षी शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT