salon professional
salon professional sakal media
पुणे

'जुन्नरला सलून दुकाने पाच जूनपासून सुरू करणार'

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर तालुका ग्रामीण नाभिक विकास संस्थेने सलून व पार्लर दुकानांवर घातलेली बंदी उठवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आम्हाला शुक्रवार दि.४ जून पर्यंत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अन्यथा सलुन व्यवसायिक दि. ५ जून रोजी दुकान सुरु करतील यानंतर प्रशासनाने दुकानावर कायदेशीर कारवाई केल्यास सहकुटुंब जेलभरो आंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसील कार्यालय तसेच पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे.

नाभिक समाज हा ९० टक्के भुमीहीन तर १० टक्के अल्पभुधारक आहे. सलुन व पार्लर या व्यवसायावर कुटुंबाची उपजिविका अवलंबून आहे.बंदीच्या आदेशामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या वेळी पाच महिने व्यवसाय बंद होता. समाजातील २७ हुन अधिक व्यावसायिकांनी कर्ज बाजारी पणामुळे आत्महत्या केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. समाजास कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत, दुकानभाडे, लाईटबील माफी, मुलांची शाळा/ कॉलेज शुल्क माफ करण्यात आले नाही. त्यात दुसरा लॉकडाऊन लावण्यात आल्याने सलुन व्यावसायिकांवर अन्याय होत आहे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जुन्नर तालुका ग्रामीण नाभिक विकास संस्थेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, उपाध्यक्ष सचिन कोळेकर, कार्याध्यक्ष सुनिल खंडागळे यांंच्या सहीने निवेदन देण्यात आले. सरकार सलुन व्यवसाय बंदच ठेवणार असेल तर सर्व नाभिक व्यवसायिकांना दरमहा वीस हजार रुपये पॅकेज द्यावे. मुलांना शाळा/कॉलेज शुल्क माफ करण्यात यावे.वीजबिल माफ करण्यात यावे. घरभाडे, दुकानाचे भाडे व घरपट्टी हे माफ करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT