सोमेश्वरनगर, ता. २४ ः नीरा (ता. बारामती) येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयाला कर्नाटकातील एक्झंबा येथील बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या मोठ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन संस्थेचे कामकाज समजून घेतले. ग्रामीण भागात कामकाज असतानाही पावणेतीनशे कोटींच्या ठेवी, संगणकीकृत कारभार आणि ग्राहकाभिमुख सेवा या गोष्टींचे या पथकाने कौतुक केले.
चिक्कोडीनजीक एक्झंबा येथील ''बिरेश्वर'' या मल्टिस्टेट दर्जाच्या सहकारी संस्थेच्या तब्बल ११० शाखा असून ३५०० कोटींच्या ठेवी आहेत. या संस्थेचे संस्थापक व चिक्कोडीचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, संस्थाध्यक्ष आप्पासाहेब जोल्ले यांच्यासह संचालक व अधिकारी अशा सतरा जणांच्या पथकाने तब्बल पाच तास समता पतसंस्थेचे कामकाज समजून घेतले. पावणेतीनशे कोटीपर्यंतच्या ठेवी आणि १९० कोटींपर्यंतचे कर्जवाटप यासोबत नीरा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या जनार्दनभाऊ फरांदे सार्वजनिक वाचनालय आणि आर्थिक साक्षरतेचे उपक्रम पाहून पथकाने समाधान व्यक्त केले. पतसंस्थेच्या ‘समता पॅलेस’ तसेच ‘समता रॉयल’ या व्यावसायिक दालनाचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी समता पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे, उपाध्यक्ष उत्तम आगवणे, संचालक मनोज शहा, व्यवस्थापक राहुल ढोले, शाखाधिकारी मनोज गारडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.