potato.jpg 
पुणे

सातगाव पठार येथील बटाटा उत्पादक आंदोलनाच्या पवित्र्यात 

जयदीप हिरवे

सातगाव पठार (पुणे) : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बटाटा काढणीचा हंगाम सुरू असतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेले बटाटे सडले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला आहे. त्यामुळे सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा या परिसरातील शेतकरी मोठ्या आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे पेठ (ता. आंबेगाव) येथील बटाटा उत्पादक शेतकरी राम तोडकर यांनी सांगितले. 

आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार भागात गेले काही दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहत आहेत. शेतात पाणी साचत असल्याने काढणीला आलेले बटाटे साचलेल्या पाण्यामुळे काढता येत नाहीत. परिणामी ते बटाटे काढतानाच बहुतांशी प्रमाणात सडलेले निघत आहेत. त्यानंतर काढून झालेले बटाटे शेताच्या बांधावर आरण लावून सुरक्षित झाकून ठेवले तरी दोन ते तीन दिवसांनंतर त्यातीलही बटाटे सडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातगाव पठार भागातील पेठ, पारगाव तर्फे खेड आदी परिसरातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. जवळपास निम्मे बटाटे सडल्याने टाकून द्यावे लागत आहेत. त्यामुळे अगदी हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला असून शेतकऱ्यांचा या पिकासाठी झालेला भांडवली खर्च वसूल होणार की नाही याबाबत आता शाश्वतीच नसल्याचे येथील बटाटा उत्पादक शेतकरी अशोक बाजारे, सोपान नवले, रमेश काळे, शंकर काळे, विकास बारवे, अनिल एरंडे, शिवाजी पवळे, उमेश कंधारे आदी शेतकऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT