सांगली जिल्ह्यातील १४ गावे,
८१ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
जतमध्ये सर्वाधिक संकट; २० हजार नागरिक, ४४ हजार पशूंना टँकरचा आधार
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उजाडला तरी सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील १४ गावे आणि ८१ वाड्यांमधील २०,५९० नागरिक व ४४,२३९ पशुधनासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी १७ खासगी विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे. या गावांसह वाड्यावस्त्यांवर १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे
जिल्ह्यात जून महिन्यात १०० मिलिमीटर, तर जुलै महिन्यात १७८.१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असली तरी दुष्काळी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जत तालुक्यात टंचाईचा सर्वात मोठा फटका सर्वाधिक आहे. तालुक्यातील सिंदूर, कोलगिरी, सोन्याल, सुसलाद, दारीकोनुर, लामानतांग, एकुंती व कराजनगी या गावात ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिंदूर, एकंडी आणि येळावी या ठिकाणी १ बोअर व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
आटपाडी तालुक्यातील ५ गावे आणि ९ वाड्यांवर ३ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. आटपाडी नगरपंचायत विहिरीवरून आंबेवाडी, पिंपरी खुर्द, पिंपरी बुद्रुक आणि कुरुंदवाडी या गावांच्या टँकरमध्ये पाणी भरले जात आहे. तासगाव तालुक्यातील लोकरेवाडी (६ वाड्या/भाग), १ वाडीसाठी टँकर व बोअर अधिग्रहण असून कापूरगाव व नरसिंगपूर येथे बोअर अधिग्रहित करून पाणी पुरवले जात आहे.
खानापूर तालुक्यात ६ बोअर अधिग्रहित करून नळ योजना सुरळीत ठेवली आहे. तर कवठे महांकाळ या दोन तालुक्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी चुडेखिंडी व केरेवाडी येथे २ बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील १४ गावे अन् ८१ वाड्यांमध्ये १२ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १६.५० खेपा मंजूर असून त्यापैकी प्रत्यक्षात १३.७५ खेपाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील पाणी टंचाई दृष्टिक्षेपात
- टंचाईग्रस्त गावे व वाड्या: १४ गावे, ८१ वाड्या
- प्रभावित लोकसंख्या: २०,५९० नागरिक
- प्रभावित पशुधन: ४४,२३९ जनावरे
- कार्यरत टँकर संख्या: १२ टँकर (खासगी)
- मंजूर व प्रत्यक्ष फेऱ्या: १६.५० मंजूर १३.७५ प्रत्यक्ष फेऱ्या
- अधिग्रहित विहिरी/बोअर : १७ ठिकाणी अधिग्रहण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.