पुणे

माझा प्रभाग, माझे व्हिजन - सांगोला

CD

माझा प्रभाग माझे व्हीजन
सांगोला नगरपालिका
SGW26B09329
सुसज्ज बगीचा, योग केंद्र अन् विरंगुळा केंद्र करणार
प्रभाग क्रमांक ८ चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज प्रभाग उभारण्याचा माझा निर्धार आहे. सर्वप्रथम, प्रभागातील भुयारी गटार योजनेचे काम जलदगतीने व गुणवत्तापूर्वक पूर्ण करून घेण्यावर माझा भर असेल. स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रभागातील आरक्षित जागेवर सुसज्ज बगीचा विकसित करून नागरिकांना विरंगुळ्याचे आणि आरोग्यवर्धक वातावरण उपलब्ध करून देण्यात येईल. या बगीच्यामध्ये ओपन जिमची सुविधा निर्माण करण्यात येईल. तसेच प्रभागातील नागरिकांसाठी लवकरच योगा केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू करून ज्ञानवृद्धीला चालना देण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण प्रभागातील बंद किंवा अपुरा प्रकाश असलेले पथदिवे बदलून नवीन बल्ब बसविण्यात येतील, जेणेकरून चोरीच्या घटनांवर आळा बसेल. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच मोकाट जनावरांच्या सुळसुळाटावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित पाण्याच्या टँकरद्वारे रस्त्यांवर पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात येईल. नवीन वसाहतीसाठी स्वतंत्र बाजार मंडई उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, जेणेकरून स्थानिक व्यापाराला चालना मिळेल. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी आपत्कालीन सेवेच्या टोल-फ्री क्रमांकाच्या पाट्या लावण्याचा प्रयत्न राहील.
- श्रद्धा साबळे, नगरसेविका, सांगोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Satara Highway : पुणे-सातारा मार्गावर ट्रक उलटला, खंडाळा ते केसर्डीपर्यंत वाहनांच्या रांगा

T20 WC : फायनल सोडा, पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचणे अवघड झाले; न्यूझीलंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने गणित बिघडले

Holi 2026 Puranpoli Recipe: डायबेटीजमुळे होळीला मिस करताय पुरणपोळी? साखर आणि मैद्याशिवायची स्वादिष्ट रेसिपी नोट करा

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस

SCROLL FOR NEXT