walchandnagar.jpg
walchandnagar.jpg 
पुणे

सानिया शेखची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

राजकुमार थोरात

 वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रन्स अॅकॅडमी शाळेतील सानिया नजीर शेख या विद्यार्थीनीची १७ वर्षाखाली मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चंद्रपूर येथे नुकतीच राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची निवड चाचणी पार पडली. या निवड चाचणीसाठी राज्यातुन सुमारे ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये १७ वर्षाखालील मुलींच्या ५४ ते ५७ किलो वजन गटामध्ये राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सानिया शेख हिची निवड झाली आहे. राज्यातुन १३ मुले व १३ मुलींची निवड झाली असून यामध्ये शेख हिचा समावेश आहे.

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा १२ व १८ डिसेंबर मध्ये मोहाली मध्ये होणार आहेत.  शेख हिने गतवर्षी मुंबईमध्ये झालेल्या आठ राज्यांच्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कोल्हापूरमध्ये मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तिला शाळेचे प्राचार्य व बॉक्सिंग प्रशिक्षक कृष्णदेव क्षीरसागर, अमोल गोडसे, ज्ञानेश्‍वर जगताप, आशा रणवरे, प्रचना माळशिकारे मार्गदर्शन करीत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी.के.पिल्लई, मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी आनंद नगरकर, शाळा समितीचे अध्यक्ष धीरज केसकर,उपाध्यक्ष पांडुरंग कवडे यांनी अभिनंदन केले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT