पुणे

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीसपदी माजी आमदार जगताप

CD

सासवड, ता. २५ : पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांची भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या असून, त्यात जगताप यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संजय जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली होती. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून असलेले त्यांचे जाळे लक्षात घेता, पक्षश्रेष्ठींनी ही निवड केली आहे. ‘‘पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांचा ऋणी आहे. पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,’’ असे निवडीनंतर माजी आमदार संजय जगताप म्हणाले. जगताप यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

SCROLL FOR NEXT