पुणे

खासदार संजय दिना पाटील विरोधात पत्रकारांची निदर्शने

CD

PNE26W29904
सोलापूर : खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध करताना श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी.

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा सोलापुरात निषेध
पत्रकारांना धमकीची भाषा वापरली; चौकशी करून कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवादादरम्यान धमकीची भाषा वापरल्याच्या वक्तव्याचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या पत्रकारांनी केली.
या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करण्याची हमी द्यावी, अशी मागणी पत्रकारांनी केली. निर्भीड पत्रकारितेचे संरक्षण ही लोकशाहीची मूलभूत गरज असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. या आंदोलनात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष विकास कस्तुरे आदी सहभागी झाले होते.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष खेलबुडे म्हणाले, ‘‘पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांना धमकावण्याचा कोणताही प्रयत्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारा आहे. लोकप्रतिनिधींनी संयम आणि जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे.’’ असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT