पुणे

एसआरटी अल्ट्रा मॅरेथॅान स्पर्धेत संजय, शीतल प्रथम 

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : लॉकडाऊननंतरची पहिलीच मोठी अल्ट्रा मॅरेथॅान कोवीडचे सर्व नियम पाळत वेस्टर्न घाट रनिंग फांउडेशनच्या वतीने सिंहगड, राजगड, तोरणा या तीन किल्ल्यावंर 
शनिवारी (ता. १२) रोजी तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला संपन्न झाली. कोरोनामुळे यावर्षी जरी परदेशी स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता आले नसले तरी देशभरातील १४ राज्य, ४० शहरातून ४५० स्पर्धकांचा सहभाग घेवून या स्पर्धेला पंसती दिली यामध्ये गतवर्षीचा पुरुषामधील विजेता बंगळूरचा संजय नेगी याने यावर्षीही प्रथम क्रमांक मिळवला तर महिलांमध्ये पुण्यातील डॉ. शितल कोल्हे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

दरम्यान, हि स्पर्धा तीन प्रकारात घेण्यात आली. यामध्ये सर्वात मोठा टप्पा सिंहगड पायथा गोळेवाडीपासून सिंहगड चढून उतरणे राजगड सर करुन उतरणे व किल्ला तोरण चढून उतरणे असा ५३ किलोमीटरचा शर्यतीचा मार्ग होता. या शर्यतीत बंगळूरच्या संजयने ६ तास ३२ मिनिटे ५८ सेकदात हि स्पर्धा पुर्ण करत प्रथम क्रमांक पटकाविला. तर तामिळनाडू येथील व्ही. आर. प्रताप याने ६ तास ५७ मिनिटे ३१ सेंकद वेळ नोंदवून दुसरा तर हैदराबाद येथील खोली. एस. याने ७ तास पाच मिनिटे व २७ सेंकदात हि स्पर्धा पुर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला.

महिला गटामध्ये  तीनही महिला पुणेतील असून, डॉ. शितल कोल्हे यांनी १० तास ४० मिनिटे २९ सेंकद, चंद्रभागा कचरे ११ तास ३४ मिनिटे ३१ सेंकद, प्रीती मस्के ११ तास ५० मिनिटे वेळ नोंदवून अनुक्रमे प्रथम व्दीतीय, तृतीय क्रमांक पटकाविला.
२५ किलोमीटर स्पर्धा हि गोळेवाडी, सिंहगड राजगड अशी होती. यामध्ये पुरुष गटामध्ये कोल्हापुरच्या अंकुश पाटील याने २ तास २७ मिनिटे २४ सेंकद, पुणेतील ओंकार पाटील याने २ तास ५० मिनिटे २५ सेंकद, तर बंगरुळच्या संतोष गौडा याने २ तास ५० मिनिटे ५८  सेंकद वेळ नोंदवून अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा क्रमांक पटकाविले.

या स्पर्धेतील महिला गटात हैदराबाद येथील लिपी कालिका ३ तास ३८ मिनिटे ४० सेंकद, लातुर येथील रुपाली भोसले ३तास ५२ मिनिटे २८ सेंकद, तर पुणेतील प्रती नारायण ४ तास १३ मिनिटे ३२ सेंकद वेळ नोंदवुन अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा क्रमांक पटकाविला.

११ किलोमीटर स्पर्धेत गोळेवाडी ते सिंहगड चढणे उतरणे अशी होती यामध्ये पुरुष गटामध्ये, बेळगावच्या शंकर पाटील १ तास १७ मिनिटे व ५७ सेकंद , पुणेतील अनुज करकरे १ तास २० मिनिटे ३१ सेंकद  तर डोणगाव येथील तौसिफ खान १ तास २२ मिनिटे  २४ सेकंद वेळ नोंदवत पहिला ,दुसरा, तिसरा क्रमांक पटकाविला तर महिलांनमध्ये तिनही नंबर पुणेतील महिलांनी पटकाविला असून, पुजा बुधावळे १तास ४९ मिनिटे २० सेकंद, किरण वडजे १ तास ५९ मिनिटे १९ सेंकद, कविता मोरे २ तास २ मिनिटे १३ सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा क्रमांक पटकाविले.

या स्पर्धेचे आयोजन दिग्विजय जेधे, अनिल पवार, महेश मालुसरे, दिपक गोळे, मंदार मते, दिपक गोळे, अमर धुमाळ, हरिष गवई, हर्षद राव, राजेश सातपुते यांनी केले तर
उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा  निर्मला पानसरे, पुरातत्व विभागाचे संचालक विलास वाहणे, प्रांताधिकारी संदेश शिर्के, वेल्हेचे तहसिलदार शिवाजी शिंदे, शांताराम इंगवले आदी उपस्थित होते. तर समारोप तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला झाला यावेळी संतोष रेणुसे, आनंद देशमाने, प्रदीप मरळ, संतोष मोरे, विलास पांगारे, सुनिल राजीवडे, खंडू गायकवाड आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT