Wari Sakal
पुणे

माउलींच्या पालखीचे २१ जून रोजी प्रस्थान

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी तब्बल दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा प्रथमच २१ जूनला पंढरपूरकडे पायी प्रस्थान करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) आषाढी वारीसाठी (Aashadhi Wari) तब्बल दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा प्रथमच २१ जूनला पंढरपूरकडे (Pandharpur) पायी प्रस्थान करणार आहे. ९ जुलैला सोहळा पंढरीत पोहचेल. तर मुख्य आषाढी एकादशी १० जुलैला आहे.

पंढरपूरमध्ये आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त माउली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, बाळासाहेब रणदिवे चोपदार, भागवत चवरे, भाऊ फुरसुंगीकर, सोपानकाका टेंबुकर, गुरुजीबुवा राशीनकर, एकनाथ हांडे, व्यवस्थापक माउली वीर यांच्यासह दिंडी प्रमुख व फडकरी उपस्थित होते.

दरम्यान, सोहळा २१ जूनला आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. तिथीची वृद्धी झाल्याने लोणंदमध्ये (जि. सातारा) अडीच दिवस; तर पुणे, सासवड व फलटणमध्ये प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी राहील. तर, दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार संस्थानच्या सही शिक्क्याने दिंडीकऱ्यांना वाहन पास दिले जाणार आहे.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी ॲड. विकास ढगे यांची निवड करण्यात आली. यावेळी ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी ढगे यांना शाल-श्रीफळ देत सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT