Sant Dnyaneshwar Maharaj Sakal
पुणे

माउलींच्या पालखीचे २१ जून रोजी प्रस्थान

पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. २१ जून) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. २१ जून) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

आळंदी - पायी आषाढी वारीसाठी (Aashadhi Wari) संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखी प्रस्थान सोहळा (Palkhi Sohala) परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. २१ जून) आळंदीतून (Alandi) पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान करणार आहे. सोहळा ९ जुलैला पंढरीत पोहोचणार असून, मुख्य आषाढी एकादशी १० जुलैला आहे. सोहळ्यात तीन उभे रिंगण, चार गोल रिंगण होणार आहेत. तिथीची वृद्धीमुळे लोणंदमध्ये अडीच दिवस, पुणे, सासवड, फलटणमधे प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी राहील, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा आळंदीतून २१ जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात राहील. बुधवारी (ता. २२) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी राहील. सासवडला (ता. २४ व २५ जून), जेजुरीला (ता. २६ जून), वाल्हे येथे (ता. २७ जून), असा प्रवास करून सोहळा नीरास्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे (ता. २८ व २९ जून) अडीच दिवसांच्या मुक्कामी पोहचेल. दुपारच्या जेवणानंतर लोणंदपासून पुढे चांदोबाचा लिंबला सोहळ्यातील पहिले उभे रिंगण करून पालखी तरडगाव (ता. ३० जून) मुक्कामी जाईल. फलटणला (ता. १ व २ जुलै), बरड (ता. ३ जुलै), नातेपुते येथे (ता. ४ जुलै) मुक्कामानंतर पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण करून सोहळा माळशिरस येथे (ता. ५ जुलै) मुक्कामी राहील. खुडुस फाटामध्ये सकाळचे दुसरे गोल रिंगण करून दुपारी धावाबावी माऊंटमधील भारूडानंतर सोहळा वेळापूर (ता. ६ जुलै) मुक्कामी जाईल.

ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण व दसुर फाटा येथील टप्पा येथे संत सोपानदेव व माउलींच्या बंधूभेटीनंतर भंडीशेगाव (ता. ७ जुलै) मुक्काम असेल. भंडिशेगावच्या जेवणानंतर वाखरीतील (ता. ८) दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगणानंतर सोहळा वाखरी मुक्कामी राहील. वाखरीतील दुपारच्या जेवणानंतर तिसरे उभे रिंगण आणि पादुकांजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरला (ता. ९) प्रवेश करेल.

२३ जुलैला परत आळंदीत

आषाढी एकादशीला (ता. १० जुलै) नगरप्रदक्षिणा, माउलींचे चंद्रभागा स्नान, असा कार्यक्रम आहे. त्यानंतर १३ जुलैला माउलींचे चंद्रभागास्नान, विठ्ठल-रुक्मिणी भेट, गोपाळपूर काला होईल. त्याल्यानंतर आळंदीच्या दिशेने सोहळा माघारी येणार आहे. २३ जुलैला सोहळा आषाढी वारी करून आळंदीत पोहचेल.

सोहळ्यातील रिंगणे व ठिकाण

१) पहिले उभे रिंगण- चांदोबाचा लिंब

२) पहिले गोल रिंगण- पुरंदवडे

३) दुसरे गोल रिंगण- खुडुस फाटा

४) तिसरे गोल रिंगण- ठाकुरबुवाची समाधी

५) दुसरे उभे रिंगण- बाजिरावची विहीर वाखरी

६) चौथे गोल रिंगण- बाजीरावची विहीर वाखरी

७) तिसरे उभे रिंगण- पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

IOB Recruitment 2025: IOB मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी होईल?

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT