Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala sakal
पुणे

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : इंद्रायणी काठ फुलला! माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान

राज्यभरातून वारकरी अलंकापुरीत दाखल.

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - खांद्यावर उंचावणाऱ्या भगव्या पताका... टाळ मृदंगांचा निनाद... माउलीनामाचा गजर ...आणि अधूनमधून मृग नक्षत्राच्या पडणाऱ्या सरी अंगावर झेलत पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेले लाखो वारकरी आळंदीत माऊलींच्या प्रस्थानास दाखल झाले आहेत.

या सुखसोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या मुखातून येणाऱ्या माउलीनामाच्या अखंड जयघोषाने अलंकापुरी भक्तिमय झाली आहे. शनिवारी (ता. २९) माउलींच्या पालखीचे प्रस्थान दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आळंदीतून पंढरीकडे केले जाणार आहे.

यंदाच्या वर्षी माउलींचा पालखी सोहळा जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्रस्थान करणार आहे. राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरण्यांची कामे उरकत आली आहेत. शेतकरी पावसाबाबत समाधानी दिसत आहे. यामुळे चार दिवसांपासून आळंदीतील वारकऱ्यांची गर्दी दोन तीन वर्षांपेक्षा अधिक दिसून येत आहे. ठिकठिकाणाहून दिंड्या आळंदीत दाखल होत आहेत.

दिंड्यांमधील वारकरी धर्मशाळेत निवारा करत आहेत. काही वारकरी आळंदीजवळील चऱ्होली केळगाव, हनुमानवाडी, चऱ्होली बुद्रुक, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव मोशी भागात मुक्काम करत आहेत.

वारीनिमित्त आलेल्या दिंड्या, वारकरी धर्मशाळा आणि राहुट्यांमध्ये विसावल्या आहेत. अखंडपणे ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष कानी ऐकू येत आहे. ठिकठिकाणी फड राहुट्यांमधून तसेच सिद्धबेटात वारकरी पारायण, कीर्तन प्रवचन, नगरप्रदक्षिणा नित्यनेम करताना दिसत आहेत.

कार्यक्रम

  • पहाटे ४ - घंटानाद

  • पहाटे ४.१५ ते ५.३० - काकडा, माउलींच्या समाधीस पवमान अभिषेक

  • ५. ०० ते सकाळी ९.०० - भाविकांच्या महापूजा

  • सकाळी ६ ते दुपारी १२ - समाधी दर्शन

  • सकाळी ९ ते ११ - वीणामंडपात कीर्तन

  • दुपारी १२ ते १२.३० - गाभारा स्वच्छता, समाधीस पाणी घालणे, माउलींना महानैवेद्य

  • दुपारी १२.३० ते १ - समाधी दर्शन

  • दुपारी १.३० ते २ - माऊलींना पोशाखासाठी दर्शन बंद. मानाच्या ४७ दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश आणि माउलींच्या अश्वांचे आगमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT