पुणे

चिंचवडगावात हरिनामाच्या गजरात संतभेटीचा सोहळा

CD

चिंचवड, ता. ९ : चिंचवडगावात जगद्‍गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या पादुकांची रविवारी (ता.९) भेट भक्तिभावाने पार पडली. या संतभेटीचे दर्शन घेण्यासाठी चिंचवडसह शहरातून हजारो भाविकांची मांदियाळी जमली. टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकाराम आणि हरिनामाच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला.
चिंचवड देवस्थानचे विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. जगद्‍गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे आदी मान्यवरांनी दोन्ही संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले. श्री मोरया गोसावी महाराज यांच्या पादुकांचे पूजन व आरतीही करण्यात आली. पिंपरीहून चिंचवडकडे येताना उड्डाणपुलापासून पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. स्वागत सोहळा झाल्यावर पालखी भोईरनगरमार्गे खंडोबामाळ, आकुर्डीच्या दिशेने पुढे देहूकडे रवाना झाली.
तत्पूर्वी, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट, रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या आणि फुलांची उधळण करण्यात आली. पिंपरी लिंक रस्त्यापासून स्वामी समर्थ मठ, गजानन महाराज मंदिर, तानाजीनगर आदी ठिकाणी भाविकांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

शंखनाद, तुतारीने स्वागत
श्री संत गजानन महाराज मंदिरासमोर संत तुकाराम महाराज व संत गजानन महाराज यांच्या पादुकांच्या भेटीचा भावपूर्ण सोहळा पार पडला. शंखनाद, तुतारी, टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आले. गजानन महाराज हरिपाठ मंडळ व गजानन सत्संग मंडळाच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख जालिंदर महाराज मोरे, यांच्यासह अन्य मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. मंदिराच्या वतीने भाविकांना फळे, फराळाचे वाटप करण्यात आले.

खिचडी प्रसादाचे वाटप
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी श्री काळभैरवनाथ उत्सव समितीतर्फे गेल्या सात-आठ वर्षांपासून अन्नदानाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. अनिल गादिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे सात ते आठ हजार भाविकांना खिचडीचा प्रसादाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT