अटक  sakal
पुणे

सराईत रिक्षा चोरास अटक

चोरीला गेलेल्या तीन रिक्षा जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फर्निचरच्या दुकानात काम करीत असतानाच रिक्षा चोरणाऱ्या सरार्इत चोरास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आत्तापर्यंत तीन रिक्षा चोरल्याची कबुली दिला आहे. यातील दोन रिक्षा आरोपीने बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या आहेत. समीर दिलीप रेणुसे (वय २२, रा. पापळवस्ती बिबवेवाडी, मुळ रा. वेल्हा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रेणुसे हा सातारा रस्त्यावर धनकवडीमध्ये एका एका फर्निचरच्या दुकानामध्ये कामास असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याकडून एक लाख २० हजार रुपयांच्या तीन रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास पोलिस अंमलदार श्यामराव लोहोमकर व तपास पथकातील इतर पोलिस करीत होते. तेव्हा त्यांना बातमीदारामार्फत रेणुसे बाबत माहिती मिळाली. चोरलेल्या रिक्षांचे पार्ट काढून विकणार असल्याने त्याने पोलिसांना सांगितले आहे. रेणुसे याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी येरवडा कारागृह करण्यात आली आहे.

परिमंडळ पाचच्या पोलिस उपआयुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनानुसार बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे, लोहोमकर, शिवाजी येवले, अतुल महागडे यांनी ही कारवार्इ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT