पुणे

‘कलासिद्धी’च्या नृत्यांगनांचे ‘अरंगेत्रम’ सादरीकरण

CD

​सासवड, ता. ६ : गणेश तांडवम, नटराज कौतुकम, अलारिपू, जतिस्वरम, दशावतार आणि राघव वर्णम यांसारख्या पारंपरिक शास्त्रीय नृत्य प्रकारांबरोबरच महालक्ष्मी अष्टक, ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘मी राधिका’, ‘अच्युतम केशवम’ आणि ‘हरी म्हणा’ या भक्तिमय अभंग रचनांवर लय व तालबद्ध पदन्यास आणि तितकाच तोडीचा भावपूर्ण अभिनय सादर करत सासवडच्या पाच गुणी नृत्यांगनांनी रसिकांची मने जिंकली.
​सासवड येथील ‘कलासिद्धी नृत्यालया’च्या वतीने आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आयोजित ‘अरंगेत्रम’ या शास्त्रीय नृत्य सोहळ्यात सासवडकरांना नृत्याची अनुभूती मिळाली. कलासिद्धी नृत्यालयाच्या शिक्षिका धनश्री लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी जगताप, नेत्रा ठवाळ, शर्वरी देशमुख, ऋता खळदकर आणि शमिका मोने या पाच नृत्यांगनांनी सादरीकरणाने उपस्थितांची वाहवा मिळवली.
गायिका सिंधू बलराज, मृदंगम वादक दक्षिणामुर्ती पिल्लई, व्हायोलिन वादक बालसुब्रम्हण्यम, बासरी वादक संजय शशिधरन आणि घटम वादक शंकरनारायण, वैष्णवी रासकर यांच्या दर्जेदार संगीत साथीने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, माजी उपनगराध्यक्षा ॲड. कला फडतरे, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप आणि सचिव हेमंत ताकवले यांच्या हस्ते कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पुष्पांजली, घुंगरू पूजन, नटराज प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन व गुरु आशीर्वाद कार्यक्रम यावेळी झाले.
सूत्रसंचालन पूर्वाराणी जगताप आणि स्वानंद लोमटे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT